चेन्नईत हत्येनंतर तरुणीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार

प्रेयसीच्याच मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेन्नईत घडली. चेन्नईत घडलेल्या या बलात्काराप्रकरणी पोलिसांनी विरारमधून आरोपीला अटक केली.

वसई : प्रेयसीच्याच मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेन्नईत घडली. चेन्नईत घडलेल्या या बलात्काराप्रकरणी पोलिसांनी विरारमधून आरोपीला अटक केली. राजू मणी नायर असे आरोपीचे नाव आहे. (Rape accused of murdering girl in Chennai arrested from Virar)

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील पूनमल्ली परिसरात राहणारी एक महिला पतीशी विभक्त झाली होती. त्यानंतर ही महिला विवाहित असलेल्या राजू मणी नायर याच्याकडे आपल्या 18 वर्षांच्या मुलीसह राहण्यासाठी आली होती. 12 नोव्हेंबरला ती महिला कामासाठी बाहेर गेल्यानंतर राजूने तिच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर बलात्कार करून राजू घराला कुलुप लावून पळून गेला होता.

18 वर्षीय मुलीची आई घरी परतली तेव्हा त्या घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. त्यावेळी त्या महिलेने स्वतः जवळ असेलल्या चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला असता तिला मुलगी घरात बेशुध्दावस्थेत पडलेली आढळून आली. त्यानंतर तातडीने त्या महिलेने त्या मुलीला डॉक्टरांकडे नेले. दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्या मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

राजूने मुलीची हत्या केल्यानंतर दरवाजाला कुलूप लावून जाताना शेजाऱ्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात पूनमल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केली. त्यानुसार, फॉरेन्सिक अहवालात तिची गळा दाबून हत्या केल्याचे आणि हत्येनंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले. बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी राजूचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, पळून जाताना राजूने त्या मुलीचा आणि तिच्या आईचा मोबाईल फोन चोरले. पळ काढल्यानंतर राजूने स्वतःचा फोन बंद ठेवला होता. काही वेळानंतर राजूने चोरलेला एक फोन सुरु केला, असता त्याचे लोकेशन विरार पूर्वेकडील फुलपाडा येथे आढळले. त्यानंतर या लोकेशनच्या आधारे चेन्नई पोलिसांनी विरारला येऊन विरार पोलिसांच्या मदतीने राजूला त्याच्या विरार येथे राहणाऱ्या पत्नीच्या घरातून अटक केली.


हेही वाचा – ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’; मुंबईत लागलेल्या होर्डिंग्सची चर्चा