अकोले : अत्याचार करणाऱ्या नराधमाचा हैदराबाद पोलीस स्टाईलने बदला

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला आहे.

rape accused was killed in akole ahamadnagar
संग्रहित छायाचित्र

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथे ३ फेब्रुवारी रोजी नांदोरी चौकात एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये ही तरुणी ४० टक्के भाजली आहे. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका ५५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती पीडितीने कुटुंबियांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी नराधमाला मारहाण करुन ठार मारले. याप्रकरणी राजूर पोलिसांत अत्याचाराचा आणि खूनाचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहे.

नेमके काय घडले?

अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील शिरपुंजे गावात एका ५५ वर्षीय महिलेवर गावातीलच एका ४५ वर्षीय राजू गणपत सोनावणे या व्यक्तीने अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेने सदर घटना घरी सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी सदर आरोपीला गावात मारहाण केली. तसेच या मारहाणी दरम्यान, आरोपी पळून जाऊ नये याकरता आरोपीला दगडी बाकाला बांधून ठेवले आणि मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन राजूरला आणण्यात आले. दरम्यान, जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी राजूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. परंतु, आरोपीची प्रकृती गंभीर असल्याने नाशिकला हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – हिंगणघाट पीडितेचा खटला फास्ट ट्रॅकवर