Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाविकास आघाडीतील अजून एक नेता अडचणीत, महिलेचा बलात्काराचा आरोप

महाविकास आघाडीतील अजून एक नेता अडचणीत, महिलेचा बलात्काराचा आरोप

परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून आपले अश्लिल व्हिडीओही काढण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीमागची शुक्लकाष्ठ कमी होत नाहीयेत. पूजा चव्हाण -संजय राठोड प्रकरण, धनंजय मुंडे-रेणू शर्मा प्रकरणानंतर आता परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार आणि नेते राजेश उत्तमराव विटेकर यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला असून आपले अश्लिल व्हिडीओही काढण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.याचपार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देसाई यांनी विटेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

या पत्रकार परिषदेत पीडिताही हजर होती. विटेकर माझ्यावर वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करत असून त्यांनी माझे अश्लिल व्हिडीओ देखील बनवले आहेत. मी त्याविरोधात पोलीस तक्रारही केली. पण माझ्याकडे त्यांच्याविरोधात पुरावे असूनही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. फक्त तपास सुरू आहे असेच मला सांगितले जात असल्याचे पीडितेने यावेळी सांगितले. विटेकर शरद पवार यांच्या जवळचे असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा दावाही संबंधित महिलेने यावेळी केला. त्याचबरोबर विटेकरांच्या आईचाही यात सहभाग होता यामुळे या दोघांना अटक करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना पद गमवावे लागले होते. सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली होती. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील एक नेता अडचणीत आल्याने त्यावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

- Advertisement -