Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका तरुणीने मंगेश सातमकर यांच्यावर यांच्या गभीर आरोप केले आहेत. तसेच, वडाळा टीटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर (mangesh satamkar) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका तरुणीने मंगेश सातमकर यांच्यावर यांच्या गभीर आरोप केले आहेत. तसेच, वडाळा टीटी पोलीस ठाण्यात (Wadala TT Police) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, मंगेश सातमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करण्यात आला आहे. (rape case file against mangesh satamkar former corporator of uddhav thackeray group)

मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्यावर 29 वर्षीय तरुणीने खळबळजनक आरोप केले आहे. त्यानंतर सातमकर यांच्याविरुद्ध वडाळा टीटी पोलीस ठाण्यात लैंगिक छळाची लेखी तक्रार या तरुणीने दाखल केली आहे. विशेष म्हणजे पीडित मुलगी ही मंगेश सातमकर यांचे सोशल मीडिया आणि जनसंपर्काचे काम पाहते. लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

- Advertisement -

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सातमकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सातमकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Operation Kaveri : सुदानमधून भारतीयांची 20वी तुकडी जेद्दाहला पोहोचली, आतापर्यंत 3000 लोक परतले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -