Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्राइम ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार

Related Story

- Advertisement -

प्रवासादरम्यान ओळख झालेल्या चालकाशी मैत्री करत मनमोकळे करणे एका महिलेला चांगले महागात पडले. चालकाने ओळख वाढवत महिलेच्या मोबाईलमधून फोटो व व्हिडीओ घेऊन तू जर माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीतर, तुझे फोटो बहीण व मेहुण्यास पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी चालकाने देत महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि.२०) सायंकाळी सापळा रचून एकास अटक केली.

श्रीरंग पांडुरंग कटके ऊर्फ अंकुश पाटील (रा. सिन्नर, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील निंबोणी येथील एक 29 वर्षीय महिला बहिणीस भेटण्याकरीता घोटी (ता.इगतपुरी, जि. नाशिक) येथे गेली होती. तिला भेटून ती परत गावाकडे निघाली होती.
त्यावेळी ती सिन्नर तालुक्यातील श्रीरंग पांडुरंग कटके ऊर्फ अंकुश पाटील याच्या छोटा हत्तीमध्ये बसून गावाकडे आली. प्रवासादरम्यान श्रीरंग कटकेने मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने मोबाईलव्दारे महिलेशी संपर्क साधत ओळख वाढवली. त्याच्यावर विश्वास ठेवेत पीडित महिलेने आयुष्यातील सुखदु:खाचे क्षण शेअर केले. तिने तिच्या मोबाईलमध्ये खासगी फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये घेतले होते. महिलेचे खासगी आयुष्यातील फोटो व व्हिडीओ मिळताच त्याआधारे त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तू जर माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीतर तुझे फोटो बहीण व मेहुणे यांना दाखवण्यासह सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी त्याने तिला धमकी दिली. त्यातून त्याने तिच्यावर वारंवार वारंवार अनैसर्गिक बलात्कार केला. तिला लोखंडी गजाने मारहाण करत दुचाकी तोडफोड केली. तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेतली. याप्रकरणी पीडितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

- Advertisement -