घरमहाराष्ट्रब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

खेड : एका नराधमाने भावाच्या नात्याचा हवाला देत बहिणीच्या मैत्रिणीसोबत सेल्फी काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत. बहिणीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुडूस गावात घडली आहे. त्या नराधमाने बलात्काराचे चित्रण करून तेही व्हायरल करण्याचे धमकी देत त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेलही केले आहे.

खेड तालुक्यातील कडूस गावात एक महिन्यापूर्वी ही घटना घडली. त्या गावातील सचिन रघुनाथ टोके या २१ वर्षांच्या नराधमाच्या घरी त्याच्या बहिणीची मैत्रिण आली होती. मी तुझ्या भावासारखच आहे, असे सांगत सचिनने त्या अल्पवयीन मुलीसोबत सेल्फी काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी सचिनने त्या मुलीला देत गावाच्या बाहेर बोलावले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यादरम्यान सचिनच्या मित्राने त्याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत सचिनने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

- Advertisement -

सचिनने बलात्काराची क्लिप काही मित्रांना व्हायरल केली. त्यामुळे त्याची चर्चा त्या अल्पवयीन मुलीच्या शाळेत होऊ लागली. त्यामुळे पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून सचिन रघुनाथ टोके आणि त्याचा मित्र मयूर दगडू टोके, या दोघांना अटक केली आहे. मुलगी अनुसूचित जाती-जमातीची असल्यामुळे याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलमाद्वारेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -