केनियातील दुर्मिळ प्रजातींच्या पांढऱ्या रंगाच्या जिराफाची शिकाऱ्यांकडून हत्या

केनिया अभयारण्यातील दोन दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या जिराफांची शिकाऱ्यांकडून हत्या करण्यात आली आहे.

पांढरा जिराफ २
केनियातील दुर्मिळ प्रजातींच्या पांढऱ्या रंगाच्या जिराफाची शिकाऱ्यांकडून हत्या

आफ्रिका खंडातील विविध देशांमध्ये वन्यजीवांबाबत काही वैशिष्ट्ये दिसून येतात. केनियात भेट देणार पर्यटक आवर्जुन जंगल सफारी करतात. यांच्यामध्ये काही जिराफ वैशिष्ट्यपूर्ण असतात. जिराफांमधील दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या पांढऱ्या रंगाचे तीन जिराफ केनियामध्ये आढळत होते. मात्र, आता यातील दोन जिराफांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकच पांढरा जिराफ केनियाच्या जंगलात आहे. दुर्मिळ असणाऱ्या प्राण्यांमध्ये या पांढऱ्या रंगाच्या जिराफांचा समावेश होतो. केनियामध्ये २०१७ मध्ये हे जिराफ आढळले होते. यामध्ये एक, नर, मादी आणि एक लहान जिराफांचा समावेश होता. या तीन जिराफांपैकी मादी आणि पिल्लूची हत्या करण्यात आली आहे. शिकारींनी या दोघांना ठार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे केनियासह जगभरातील वन्यजीव प्रेमींमध्ये संताप उसळला आहे. पांढऱ्या रंगाचे जिराफ फक्त केनियात आढळत असल्याचा दावा करण्यात येत होता.

‘आफ्रिका वाइल्डलाइफ फाउंडेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, मागील ३० वर्षात जिराफांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जिराफांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाली आहे. मांस आणि चामड्यासाठी जिराफांची हत्या करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनने दिली आहे. वर्ष १९८५ मध्ये जिराफांची संख्या १ लाख ५५ हजार होती. तर, २०१५ च्या आकडेवारीनुसार ही संख्या आता ९७ हजार इतकी असल्याची माहिती पर्यावरण वन्यजीव संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘आययूसीएन’ने दिली.

२०१६ साली पहिले पांढरे जिराफ आढळले

जिराफ म्हटले की उंच असणारा, पिवळसर रंग, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची व आकारमानांची आकृती असणारा शाकाहारी प्राणी डोळ्यासमोर येतो. वर्ष २०१७ साली माध्यमांमध्ये दोन जिराफांची जोरदार चर्चा सुरू होती. या दोन जिराफांचा रंग इतर जिराफांपेक्षा वेगळा होता. मात्र, हे जिराफ पांढऱ्या रंगाचे होते. जगातील दुर्मिळ जिराफांपैकी एक जिराफ होते. त्यामुळे त्यांची अधिक चर्चा होती. केनियातील अभयारण्यात २०१६ मध्ये पांढरे जिराफ पहिल्यांदा आढळले होते.

पांढरा जिराफ ३
केनियातील दुर्मिळ प्रजातींच्या पांढऱ्या रंगाच्या जिराफाची शिकाऱ्यांकडून हत्या

पांढऱ्या जिराफाची शिकाऱ्यांकडून हत्या झाल्याचा संशय

केनियाच्या अभयारण्यात एकूण तीन पांढरे जिराफ होते. त्यातील मादी आणि त्याच्या पिल्लाची शिकाऱ्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे आता एकच पांढरा जिराफ शिल्लक आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर-पूर्व केनियातील गरिसा काउंटी गावात मादी आणि पिल्लूचा मृतदेह आढळला. या पांढऱ्या जिराफांची शिकार कोणी केली हे अद्याप समोर आलेले नाही. शिकार करणाऱ्यांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिराफांचे मांस, चामडे यांना आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत असते. त्यामुळे जिराफांची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पांढरा जिराफ १
केनियातील दुर्मिळ प्रजातींच्या पांढऱ्या रंगाच्या जिराफाची शिकाऱ्यांकडून हत्या

‘ल्यूसलिज्म’ नावाच्या अनुवांशिक आजारामुळे पांढरे जिराफ

जिराफ हे पिवळसर रंग, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकाराची आकृती असणारे असतात. मात्र, पांढरे जिराफ वेगळे असतात. हे जिराफ पांढरे का असतात? तर, एका आजारामुळे हे जिराफ पांढरे असतात. ल्यूसलिज्म नावाच्या अनुवांशिक आजारामुळे हे जिराफ पांढरे असतात. या आजारात त्वचा पेशींची पिग्मेंटेशन (त्वचेचा मूळ रंग नसणे) प्रकिया थांबवते. ल्यूलिज्ममध्ये जिराफाच्या डोळ्याजवळ काळा रंग आढळतो. त्यामुळेच या पांढऱ्या जिराफांची गणना दुर्मिळ प्रजातीत होत असते.

तीन महिन्याआधीच ठार केलेल्या दोन्ही जिराफांना पाहण्यात आले होते. दोन जिराफांची शिकार ही केनियासाठी दु:खद घटना आहे. संपूर्ण जगात फक्त केनियातच हे पांढरे जिराफ आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे पांढऱ्या रंगाचे जिराफ खास आकर्षण होते. या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी पांढऱ्या जिराफांची महत्त्वाची भूमिका होती.
– मोहम्मद अहमदनूर, विभाग व्यवस्थापक, इशाकबीनी हिरोला वन्यजीव संरक्षण.