घरताज्या घडामोडीफोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला

Subscribe

फोन टॅपिंग प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप शुक्ला यांच्यावर होता. परंतु या प्रकरणात पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे कोर्टाने फेटाळला आहे. रश्मी शुक्ला या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे फडणवीसांना हा मोठा धक्का असल्याचे समजले जात आहे.

रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील काही आमदारांचे, काही तत्कालीन मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. परंतु सत्ताबदल झाल्यानंतर रश्मी शुक्लांना क्लिनचीट देण्यात आली होती. पुणे पोलिसांनी याप्रकरणी कोर्टात रिपोर्ट सादर केला होता. मात्र, कोर्टाने हा रिपोर्ट फेटाळून लावला आहे. त्यामुळे शुक्लांच्या अडचणी आता वाढणार आहेत.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या होत्या. तसेच त्यांनी दिल्लीतही एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे समोर आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण देखील आलं. मात्र, आता कोर्टाने क्लोजर रिपोर्ट फेटाळल्यामुळे राज्य सरकारच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : सीमावादावर तोडगा निघेपर्यंत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री…, पृथ्वीराज चव्हाणांचा अजब सल्ला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -