घरमहाराष्ट्ररश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या 11 सदनिका जप्त, ईडीची मोठी कारवाई

रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांच्या 11 सदनिका जप्त, ईडीची मोठी कारवाई

Subscribe

ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय, असंही ईडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

ठाण्यात ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. पुष्पक बुलियन प्रकरणात श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीनं सील केल्यात. श्रीधर पाटणकरांच्या एकूण 6.45 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणलीय. श्रीधर पाटणकरांचं हे प्रकरण पुष्पक बुलियन कंपनीशी संबंधित असून, यात आतापर्यंत 6.45 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलीय.

या कारवाईतच श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ही कंपनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील अशर आयटी पार्कमध्ये नीलांबरी प्रोजेक्टमध्ये 11 सदनिका आहे. त्या सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -


ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय, असंही ईडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई झाली होती. परंतु आज उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकरांच्या मालकीच्या श्रीसाईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिकांवर झाली आहे. या सदनिका ठाण्यातील नीलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँड्रिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचाः  नारायण राणेंना मोठा दिलासा, निकाल विरोधात गेल्यास 3 आठवडे कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -