घरताज्या घडामोडी...तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान

…तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद सांभाळू शकतात, शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर आणि मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते राज्याचा कारभार वर्षावरुनच हाकत आहेत.मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत म्हणून विरोधी पक्ष भाजप सातत्याने टीका करत आला आहे. त्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्र्यांविना झाले. यावरुन देखील भाजपच्या नेत्यांनी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर आणि मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते राज्याचा कारभार वर्षावरुनच हाकत आहेत. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत म्हणून विरोधी पक्ष भाजप सातत्याने टीका करत आला आहे. त्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुख्यमंत्र्यांविना झाले. यावरुन देखील भाजपच्या नेत्यांनी टीका केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला दिला होता. दरम्यान, आता शिवसेनेच्या मंत्र्यांनेच मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले आहे.

अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले. रश्मी ठाकरे या उत्तम प्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात. त्या पदड्याच्या मागे काम करत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत; पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बर्‍यापैकी माहिती आहे. कारण त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतात. आदित्य ठाकरे कसे काम करतात, उद्धव ठाकरे कसे काम करतात, या सर्वांच्या पेक्षा एक महिला म्हणून त्यांचे नियोजन, कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचे बळकटीकरण कसे व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मूल न करता, त्यांना सक्षम कसे करायला पाहिजे यासाठी रश्मी ठाकरे प्रयत्न करत असतात, असे सत्तार म्हणाले.

- Advertisement -

तसेच, पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंचा आदेश असेल तर काहीही होऊ शकते. त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात, असा दावा सत्तार यांनी केला.रश्मी ठाकरे ‘सामना’च्या मुख्य संपादक म्हणूनही उत्तम काम करत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचे नाव आहे, असे देखील सत्तार म्हणाले.

गडकरी भाजप-शिवसेनेचा पूल जोडू शकतात

२५ वर्षे एकत्र असलेली भाजप आणि शिवसेनेची युती २०१९ साली मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून तुटली. एकमेकांपासून फारकत घेतलेले दोन्ही पक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे एकत्र येऊ शकतात, असा दावा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील पूल नितीन गडकरीच जोडू शकतात, असे सत्तार म्हणाले. सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी हा दावा केला.

- Advertisement -

नितीन गडकरींनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवल्यास शिवसेना आणि भाजप एकत्र येतील. नितीन गडकरी हे राजकारणातील एक चालते-बोलते विद्यापीठ आहे. गडकरी हे राज्याचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवले पूल बनवण्याचे तर कुठेही कसाही पूल बनवणे, कशामुळे जोडणे, कशाप्रकारे जोडणे, हे त्यांना चांगले माहिती आहे. देशात त्यांचे मोठे नाव आहे. त्यांनी भाजप-शिवसेनेचा पूल जोडायचे मनावर घेतले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंकडे युतीचा प्रस्ताव ठेवला तर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप एकत्र येतील, असा दावा सत्तार यांनी केला.


हेही वाचा – Jitendra Awhad यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ; भाजप विरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -