सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी नसल्याचे राजकारण करू नका, संघाचे आवाहन

Mohan Bhagwat

स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवानिमित्त देशभारात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून हर घर तिरंगा उपक्रमाबद्दल सांगताना लोकांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा डीपी लावण्याचे आवाहन केले होते. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी हातात तिरंगा घेतलेला फोटो डीपाला लावला आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सरसंघचालकांनी त्यांचे डीपी बदलले नसल्याने सोशल मिडियावरून त्यांच्यावर टीका होत आहे. यावर आरएसएसने प्रतिक्रिया दिली आहे.

आरएसएसची प्रतिक्रिया –

यावर आरएसएसने अशा गोष्टींचे राजकारण करू नये. हर घर तिरंगा, आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांना आरएसएसने आधीच पाठिंबा दिला आहे. तसेच जुलै महिन्यातच लोकांना आणि स्वयंसेवकांना या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा द्यावा असे सांगण्यात आले होते. तसेच आरएससने त्यांना यामध्ये सहभागी होण्याचेही आवाहन केले होते. सरकार, खासगी संस्था आणि संघाशी संबंधित संघटनांनी अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करावे असेही आवाहन केले असल्याचे आरएसएसकडून सांगण्यात आले आहे.

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलआंबेकरांचे स्पष्टीकरण –

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतरसुद्धा RSS.org आणि सरसंघचालकांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा डीपीला न लावल्याने आरएसएसला ट्रोल केले जात आहे. यावर आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलआंबेकर यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले असे मुद्दे आणि कार्यक्रम राजकारणापासून दूर ठेवले पाहिजेत.

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा मोहिम –

हर घर तिरंगा मोहिम 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट राबवली जाणार आहे. यामध्ये नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडीया अकाउंटचे प्रोफाइल चित्र तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या डीपीचा फोटो बदलला आहे.