घरमहाराष्ट्रपुणेरतन टाटांचा एक फोन अन् बदलले पुण्यातील उद्योजक जोडप्याचे आयुष्य, वाचा स्टार्टअप...

रतन टाटांचा एक फोन अन् बदलले पुण्यातील उद्योजक जोडप्याचे आयुष्य, वाचा स्टार्टअप कंपनीचा किस्सा

Subscribe

पुण्यातील मोबाईल एनर्जी डिस्ट्रीब्यूशन रेपोस एनर्जी या कपनीचे एका फोनमुळे नशीब पालटले होते. हा फोन होता रतन टाटा यांचा. आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी पुण्यात स्टार्टअप कंपनी रेपोस एनर्जी सुरू केली होती. माबाईल उर्जा वितरण स्टार्टअप रेपोस एनर्जीने सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे मोबाई इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल लॉच केले आहे. या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांची गुंतवणुक आहे. या बाबतचा हा किस्सा आदिती यांनी शेअर केला आहे.

रतन टाटा यांच्या सोबत भेट सामान्य नव्हती. काही वर्षांपूर्वी आमचा रेपो प्रवास सुरू केला. आम्ही दोघांनी ठरवले की आम्हाला एक मार्गदर्शक हवा आहे ज्याने ‘मी मी आणि मायसेल्फ’ च्या पलीकडे मोठ्या चांगल्यासाठी काहीतरी केले आहे. आम्हा दोघांचे एक नाव होते ते म्हणजे रतन टाटा सर. आपण त्यांना भेटूया असा संवाद आमच्या झाला. पण यावर चेतनने लगेच कसंकाय जमणार? असा प्रश्न निर्माण केला. रतन टाटा आपले शेजारी नाही असेही तो म्हणाल्याचे अदिती सांगतात.

- Advertisement -

नाही हा पर्याय कधीच नव्हता –

आमच्या दोघांचे कोणतेही व्यवसायिक शिक्षण नाही. आम्ही आयुष्यात एक गोष्ट खूप लवकर शिकलो की कोणत्याही गोष्टीकडे निमित्त साधणे हा एक पाया आहे जो अपयशाचे घर बनवतो. दरम्यान तुम्ही त्यांना भेटू शकत नाही आणि ते अशक्य आहे, असे आम्हाला अनेकांनी सांगितले. मात्र, आम्ही आमचे ठरवले होते नो… हा पर्याय कधीच नव्हता आणि आम्हि उठलो आणि मुंबईला निघालो. आम्ही उर्जा विचरणात कसा बदल करु शकतो आमि तंत्रज्ञानाचा वापर करून कोणतीही उर्जा/ इंधन शेवटच्या माईल पर्यंत कसे पोहचव शकतो यांची माहिती तयार केली. ही माहिती 3D स्वरुपात होती.

- Advertisement -

रतना टाटांचा फोन –

दरम्यान आम्ही रतन टाटा यांना पत्र लिहिले होते. आम्ही त्यांच्या घराबाहेर 12 तास थांबलो होते. त्यानंतर जरा निराश होत हॉटेलला पोहचलो होतो. त्यावेळी आम्हाला एक फोन आला. आम्ही निराश झालो होतो त्यामुळे फोन उचलायची देखील इच्छा नव्हती. तो फोन होता रतन टाटा यांचा. फोनवर मला तुमचे पत्र मिळाले आपण भेटू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला.आमच्या अंगावर त्यावेळी शहारे आले होते. सकाळी 10.45 ला आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो आणि आमच्या सादरीकरणासह त्यांची वाट पाहत होतो. सकाळी 11 वाजता एक निळा शर्ट घातलेला एक उंच, गोरा माणूस आमच्या दिशेने चालू लागला आणि शांत वाटत होता. ही मिटींग तीन तास चालली. यात आम्ही आमची संकल्पना सांगितली. त्यांनी ती शांतपणे ऐकूण घेतली. त्यांनी त्यांचे अनुभव आमच्यासोबत शेअर केले. त्यांनी सहज विचारले की तुम्हाल माझ्याकडून काय अपेक्षा आहे. देशाला जागतिक पातळीवर नेण्यास मदत करा. आम्हाला मार्गदर्शन करा असे आम्ही उत्तरलो. त्यांनी फक्त ठिक आहे असे उत्तर दिले. यानंतर आम्ही दोघे तिथून बाहेर पडलो. आज त्यांच्यामुळे रिपोज ही कंपनी एवढ्या मोठ्या स्तरावर काम करत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये सांगीतले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -