घरमहाराष्ट्रकांदा-टोमॅटो कवडीमोल दराने; शेतकरी हताश

कांदा-टोमॅटो कवडीमोल दराने; शेतकरी हताश

Subscribe

आधीच दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यासाठी ही परिस्थीती म्हणजे खऱ्या अर्थाने 'दुष्काळात तेरावा' असंच म्हणावं लागेल.

दुष्काळामुळे आधीच त्रस्त झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्याला आता एक नवीन चिंता सतावते आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांतचा शेतमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांदा आणि टोमॅटोला आता चलनामध्ये अस्तित्वातच नाहीत इतक्या कमी पैशांचा भाव मिळतो आहे. सध्या संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे प्रतिकिलो दर मिळतो आहे. तर, मालेगावात टॉमेटॉला ५० पैसे प्रतिकिलो किलोचा भाव मिळतो आहे. कांदा आणि टॉमेटोला ‘पैशांमध्ये’ मिळणारा हा कवडीमोलाचा भाव खूपच धक्कादायक आणि खेदजनक आहे. यामुळे मालेगाव आणि संगमनेरमधील बळीराजा पूर्णत: हताश झाला आहे. दरम्यान, या परिस्थितीच्या निषेधार्थ  काही शेतकऱ्यांनी सगळेच्या सगळे टॉमेटो रस्त्यावर फेकून आपला राग व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील सिद्धू घुले आणि मालेगाव तालुक्यातीस योगेश ठाकरे यांनी शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोलाच्या दराबाबत जाहीर निषेध व्यक्त करत, आपली व्यथा मांडली आहे. दुष्काळाने कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला यंदा केवळ कांदाच काहीप्रमाणात तरून नेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बाजारामध्ये कांद्याला मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे आपला अखेरचा आर्थिक आधार हरपल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


वाचा: दिल्लीत शेतकरी काढणार आज २६ किलोमीटर पदयात्रा

घुले यांनी दुष्काळी परिस्थितीतही त्यांच्या शेतात काबाडकष्ट करुन कांदा पिकवला होता. मात्र, ज्यावेळी त्यांनी हा कांदा बाजारात विकण्यासाठी नेला त्यावेळी तो केवळ ६५३ रुपयांना विकला गेला, ज्यापैकी त्यांच्या पदरात केवळ ५० रुपये पडले. आपला कांदा इतक्या कमी किमतीला विकला गेल्यामुळे ते चांगलेच निराश झाले. मालेगावातही टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात त्यांचे टोमॅटो रस्त्यावर फेकायला सुरुवात केली. तर दुसरीकडे योगेश ठाकरे यांनी वडनेर इथल्या बाजारात त्यांचा टोमॅटो विक्रासाठी नेला असता, त्यांना प्रतिकिलोला केवळ ५० पैसे इतकाच भाव मिळाला. यामुळे संतप्त झालेल्या योगेश यांनी त्यांचा २० कॅरेट इतका टोमॅटो रस्त्यावर टाकला. आधीच दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यासाठी ही परिस्थीती म्हणजे खऱ्या अर्थाने ‘दुष्काळात तेरावा’ असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -