घरमहाराष्ट्र"परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा", संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

“परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

मुंबई : परदेशात जाण्यापेक्षा दुसऱ्या राज्यात गेलेले उद्योग परत आणा, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावाल आहे. राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि नागपूर पूरपरिस्थीवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा हा कोणाच्या ट्वीटमुळे रद्द झाला नाही, असे उदय सामंत म्हटले आहे, या प्रश्नार संजय राऊत म्हणाले, “ट्वीटमुळेत मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द झालेला आहे. आदित्य ठाकरेंमुळेच मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला.

राज्यातील दुष्काळपरिसस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द केल्या, यावर राऊत म्हणाले, “हे आपल्याला आधी नव्हते का कळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक घाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. पण मुख्यमंत्री हे कोणत्या देशात जाणार होते. ते फार गुप्त ठेवण्यात आले होते. कोण म्हणते की, ते जर्मनीला चालले होते. कोण म्हणते की, ते यूकेला चालले होते. घर बांधणी, जहाज उद्योग, अशा अनेक प्रकल्पांना मुख्यमंत्री भेटी देणार होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते. आम्ही आपले आभारी आहोत. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातून जी गुंतवणूक आपल्या कारर्कीदीत बाजूच्या राज्यात गेली. ती आधी घेऊन या. अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरीच मुख्यालय ती पळून घेऊन गेलेत. ती आधी घेऊन या. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या. तुम्ही तिकडे जाण्याने काय होणार आहे. सरकारी पैशाचा अपवय.”

- Advertisement -

हेही वाचा – Women’s reservation bill : ठाकरे गटाच्या चार खासदारांना शिंदे गटाकडून नोटीस

सिने कलावंत यांच्याबरोबर उत्सव साजरा करत

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्ही काल आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यानंतर समजले का?, नागपूर बिडाले आहे. हे आपल्याला काल समजले. आदित्य ठाकरेंनी ट्वीट केल्यावर, नागपूर पाण्यात बुडत असताना, लोकांचा आक्रोष सुरु असताना आपण काय करत होतात. तर आपल्य शासकीय निवासस्थानी सिनेकलाकार आणि सिने कलावंत यांच्याबरोबर उत्सव साजरा करत होतात. दु:खद प्रसंगी मुख्यमंत्र्यांने कुठे असायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना यांचे नैतिक भान असले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जिथे लोक आक्रोश करत आहेत. तिथे असायला पाहिजे. कलाकार येता आणि जातो. त्यांना काय उद्या दुसरे मुख्यमंत्री असताना ते तिकडे जाऊन नाचतील. त्यांचे काय, ते येतात आणि जातात. पण विघ्नहर्ता गणपती असताना सुद्धा या महाराष्ट्रात विघ्न आलेले आहे. या राज्याचे राज्यकर्ते म्हणून हे विघ्न हरण करण्याची जबाबदारी ही राज्याचे मुख्यमंत्री असताना आपण ना दुष्काळग्रस्त भागात गेला आहात. ना नागपूरच्या पूर परिस्थितीवर लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी गेलेला आहात.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -