घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररेशनकार्ड मिळणार ऑनलाईन, राज्य शासनाकडून निःशुल्क सेवा; तहसील कार्यालयातील एजंट लॉबी येणार...

रेशनकार्ड मिळणार ऑनलाईन, राज्य शासनाकडून निःशुल्क सेवा; तहसील कार्यालयातील एजंट लॉबी येणार संपुष्टात

Subscribe

नाशिक : रेशनकार्ड मिळविण्यासाठी याआधी सरकारी कार्यालयाचे फेर्‍या माराव्या लागयच्या. असे करायेच नसेल तर त्या कार्यालयातील एजंटला पकडून त्याला पैसे देऊन काम होत होते. यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व एजंटला आर्थिक फायदा होत होता. पण आता हे सर्व करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने रेशन कार्ड ऑनलाइन आणि निःशुल्क (मोफत) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभागाने रेशन कार्ड संदर्भात नुकताच निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना आता रेशन कार्डसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही. तसेच तहसील कार्यालयांमध्ये आणि परिमंडळ कार्यालयांमध्ये कागदपत्रांसाठी होणारी पिळवणूक तसेच एजंटला द्यावे लागणार्‍या पैशांना आता आळा बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना वीस रुपयात मिळणार्‍या रेशन कार्डसाठी आता दोन हजार रुपयांपर्यंत खर्च करावे लागणार नाही. राज्य सरकारने बुधवारी (17 मे) याबाबतचे आदेश जारी केले. अर्जदार कोणत्या प्रकारातील आहे हे समजल्यावर त्याला किती दिवसात रेशन कार्ड मिळणार हे आता ठरवले जाणार आहे. यामुळे तहसील कार्यालयामधील तसेच परिमंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि एजंटमधील लॉबी संपुष्टात येणार आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, तसेच राज्य योजनेच्या सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाइन सेवेद्वारे नागरिकांना रेशन कार्ड मोफत देण्यात येणार आहे. यासाठी अर्जदाराला रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागेल. अर्ज केल्यानंतर सरकारी कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे. यासाठी http://rcmc.mahafood.gov.in या वेबसाइटवरून रेशन कार्ड डाऊनलोडही करता येणार आहे.

या कालावधीत मिळणार कार्ड

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जदाराची माहिती मिळविण्यासाठी जसे की, जर अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच त्यासाठी रेशन अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास पूर्वीप्रमाणे सात दिवस लागणार आहेत. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर त्याला ते ऑनलाइन डाऊनलोड करता येणार आहे. त्यात रेशनसाठी त्याला कोणते दुकान मिळाले आहे, याचाही उल्लेख असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -