घरदेश-विदेशकाय सांगतास? कोकणचो हापूस आता मिळतलो Amazon वर, एक डझन आब्यांची किंमत...

काय सांगतास? कोकणचो हापूस आता मिळतलो Amazon वर, एक डझन आब्यांची किंमत…

Subscribe

हापूस आंब्याच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीनं पुढाकार आहे. कंपनीनं मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवातही केली आहे.

उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना कोकणातल्या हापूस आंब्याची चाहूल लागते. हापूस आंबा म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय कारण त्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. हापूस आंबा खाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. तसंच उत्तम आंबा विकत घेण्यासाठी बऱ्याच बाजारपेठांना पालत घालावं लागतं. मात्र आता या आंब्याची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. ‘होय खरंच सांगतलंय… हापूस आंबा आता ऑनलाईन पण मिळतलो…’ अ‍ॅमेझॉन (Amazon) या ऑनलाईन साईटवर हापूस आंबा आता विकत घेता येणार आहे.

हापूस आंब्याच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीनं पुढाकार आहे. कंपनीनं मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. ही कंपनी रत्नागिरी हापूस आंबा विकणार असून थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अ‍ॅमेझॉनने सुरुवातही केली आहे. यंदा उत्पादनात घट झाल्यानं हापूस आंबा मिळणं दुरापस्त झालं होतं. पण आता अ‍ॅमेझॉन यामध्ये उतरले असल्याने मुख्य शहरांमध्ये ग्राहकांपर्यंत हापूस आंबा पोहचवला जाणार आहे. यामुळं उत्पादकांना योग्य दर आणि ग्राहकांना खात्रीशीर भौगेलिक मानांकन मिळालेलाच आंबा मिळणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांचा हापूस आंबा अ‍ॅमेझॉन कंपनीला मिळावा याकरिता रत्नागिरी येथील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. याची सुरवात झाली आहे. आरंभीलाच या संकलन केंद्रावर 12 शेतकऱ्यांकडून 600 डझन आंब्याची खरेदी केली आहे. 185 ते 220 ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन 900 रुपयांनी खरेदी करण्यात आले.

- Advertisement -

रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, प्रमुख व्यवस्थापक राजेश प्रसाद, विवेक धवन, सुजय हेगडे, नरेंद्र जवळे यांच्यासह बागायतदार उपस्थित होते.

हापूसला चांगला दर मिळवून देण्यासोबतच बागायतदारांना गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी खते, औषधे व इतर साहित्य अ‍ॅमेझॉनकडून उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप विकसित केले जाणार असल्याचं समजतं. सध्या ऑनलाईनचा जमाना असून सर्वच व्यवहार हे ऑनलाईन चालतात. बदलत्या काळानुसार बदल केला नाही तर व्यवसायाच्या स्पर्धेत आणि नवयुगात टिकून राहता येत नाही. त्यामुळं हल्ली नागरिकांना सोयीस्कर म्हणून सर्वच व्यवहार हे ऑनलाईन चालत आहेत. त्यानुसार, विविध वस्तूंचे ऑनलाईनच्या माध्यमातून मार्केटींग आणि विक्री केली जात होती.

अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रतिनीधी हे शेतकऱ्यांच्या आंब्याची जागेवर खरेदी करणार आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूकीचा प्रश्न मिटणार आहे. शिवाय प्रत्येक आंब्याच्या पेटीवर भौगोलिक मानांकन असल्याचे प्रमाणपत्र लावावे लागणार आहे. आठवड्याभरानंतर बिटकी आंबाही खरेदी केली जाणार असल्याचं समजतं.


हेही वाचा – शिवसेना भवन मशिद आहे का? मनसेच्या संदीप देशपांडेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -