घरमहाराष्ट्रCM Eknath Shinde : कोकणातील प्रकल्पांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला, म्हणाले...

CM Eknath Shinde : कोकणातील प्रकल्पांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला, म्हणाले…

Subscribe

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता.30 नोव्हेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजन मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

 

- Advertisement -

हेही वाचा… MLA Disqualification : एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावरील प्रश्नावर सुनील प्रभू अडखळले!

या कार्यक्रमाच्यावेळी एकनाश शिंदे यांनी कोकणातील प्रकल्पांबदद्ल बोलताना ठाकरे गटाला टोला लगावला आहे. कोकणाने नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलंय. आमच्या सगळ्यांवर प्रेम केलंय. फक्त राजकारणापुरतं कोकणी माणसाला वापरून घेण्याचं काम कधीही आमचं सरकार करणार नाही. आणि इथल्या भूमी पुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची. कौतुक करायचं आणि मग एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायला लावायचा. अशा प्रकारची राजनीती, राजकारण आम्ही कधी केलं नाही. बाळासाहेबांनी ते शिकवलं नाही. दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं नाही. पण ज्यांनी कुणी केलं. ते त्यामुळे आज हा प्रकल्प एवढा उशिरा इथं सुरू होतोय.

- Advertisement -

उद्योग धंद्याला चालना देणारा

कोकणामध्ये एका बाजूला आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, त्याचवेळीस आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने उद्योगला भरभराट यावी लोकांच्या हाताला काम देणे हे दखील आवश्यक आहे. उद्योग धंदे कोकणामध्ये वाढवली पाहिजेत, अशी भूमिक आपल्या राज्य सरकारची आहे. असं मत एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोकाकोला प्रकल्पाचं भुमीपूजनच्य वेळी बोलत होते.

कोकणामध्ये होणार विकास आंबा, काजू , मासेमारी हे आपले पारंपरिक व्यावसाय आहेत. त्याचं संवर्धन आपण करतोच परंतु अत्याधुनिक जगाची गरज ओळखून आपण औद्योगिकतेची वाट देखील धरली पाहिजे, आणि म्हणूनच आज हिंदुस्थान कोका-कोला बेव्हरेजेस कंपनीने दोन हजार पाचशे कोटी रूपयांची गुंतवणूक करून पहिल्या टप्प्यामधील काम पूर्ण केले आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये कोकणामध्ये सुरूवात करत आहेत. कोकाकोला कंपनीची 60 पेक्षा जास्त उप्पादनं देशभरामध्ये आहेत. यामध्ये हजारो कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने दोन हजार तेवीसमध्ये भारतातमध्ये एकून 12 हजार 800 चाळीस कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. आणि कोकाकोला सारखी कंपनी कोकणात उभी रहात आहे, त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार देण्याची भूमिका सरकारची आहे. व्यवस्थापनाने देखील स्थानिक लोकांनाच प्राधान्य या कारखान्यामध्ये दिलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातमध्ये येणाऱ्या सर्व उद्योगांना आपण रेड कार्पेट देण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामधअये उद्योग येत आहेत आणि हिंदुस्थान कोकाकोला प्रकल्प आशियातला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या पाठोपाठ अन्य प्रकल्प कोकणामध्ये येतील. कोकणाला आपल्याला विकासाकडे , प्रगतीकडे न्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात उद्योगांना चालना दिली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -