Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र रत्नागिरी, सिंधुदुर्गला ३०० कोटी; ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेंतर्गत कृषी उद्योगांच्या विकासाला प्राधान्य

रत्नागिरी, सिंधुदुर्गला ३०० कोटी; ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेंतर्गत कृषी उद्योगांच्या विकासाला प्राधान्य

पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ७५ कोटी रुपये; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Related Story

- Advertisement -

‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली. या निधीपैकी पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ७५ कोटींच्या विकास योजनांचा प्रस्ताव दोन्ही जिल्ह्यांनी तातडीने सादर करावा. प्रस्ताव सादर करताना पर्यटनविकास, मत्स्यव्यवसायवृद्धी, कृषीआधारीत उद्योगांच्या विकासावर भर द्यावा. वैयक्तिक योजनांऐवजी सार्वजनिक विकासाच्या आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या योजनांना प्राधान्य द्यावे , असा सूचना पवार यांनी दिल्या.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ प्रभावीपणे राबवण्याबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी रत्नागिरीच्या शासकीय मत्स्य महाविद्यालयात कोळंबी हॅचरी प्रकल्पासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही दिले.

- Advertisement -

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील स्वच्छ समुद्रकिनारे आणि नैसर्गिक समृद्धी लक्षात घेता गोव्याच्या धर्तीवर या दोन जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी मोठी संधी आहे. या संधीचा उपयोग करुन स्थानिक तरुणांना रोजगार निर्माण करुन दिला पाहिजे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक समृद्धी आणण्याची ताकद पर्यटनव्यवसायात असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पर्यटकांसाठी निवारा आणि आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे अजित पवार यांनी सांगितले.

‘सिंधुरत्न समृद्ध योजनें’तर्गत दोन्ही जिल्ह्यांना दरवर्षी १०० कोटी याप्रमाणे तीन वर्षात ३०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याच्या सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाततशी घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा (व्हीसीद्वारे), सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी (व्हिसीद्वारे) उपस्थित होत्या.

 

- Advertisement -