Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रकोकणRatnagiri : रत्नागिरीत वंचितच्या उमेदवारावर हल्ला; प्रचाराच्या रणधुमाळीत गुहागरमध्ये खळबळ

Ratnagiri : रत्नागिरीत वंचितच्या उमेदवारावर हल्ला; प्रचाराच्या रणधुमाळीत गुहागरमध्ये खळबळ

Subscribe

एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असताना मनसे, वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र लढणार आहेत.

रत्नागिरी : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असताना मनसे, वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र लढणार आहेत. पण रत्नागिरी जिल्ह्यातील एका प्रकरणामुळे विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. गुहागर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विकास (अण्णा) जाधव असे या उमेदवाराचे नाव असून त्यांच्यावर गुहागर तालुक्यातील नरवण गावात झाला. (Ratnagiri vanchit bahujan aghadi candidate attacked in guhagar)

हेही वाचा : Congress : भाजपाकडून महाराष्ट्राशी भेदभाव; मोदींच्या राजवटीत, फक्त उद्योगपती अदानीच सेफ – प्रियंका गांधी 

- Advertisement -

विकास (अण्णा) जाधव हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते. तर सध्या वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघत होते. त्यानंतर आता यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली. रविवारी (17 नोव्हेंबर) दुपारी त्यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलबाहेर त्याच्यावर चाकू हल्ला झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हातावर झालेल्या चाकू हल्लात हातावर खोल जखम झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली. या प्रकरणात पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विकास (अण्णा) जाधव यांच्यावर हल्ला झाला. त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाचीदेखील तोडफोड करण्यात आली. ही घटना गुहागर तालुक्यामधील नरवण फाटा येथील एका हॉटेलमध्ये घडली. विकास (अण्णा) जाधव हे या हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलबाहेर त्यांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीदेखील तोडफोड केली. आरोपींनी त्यांच्या गाडीच्या काचादेखील फोडल्या. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. पण या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलिसांकडे हे प्रकरण असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -