मुंबई : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्ताने भेट घेटली. उल्हासनगरमधील गोळीबाराची घटना ताजी असतानाच श्रीकांत शिंदेंची भेट गुंड हेमंत दाभेकरने घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सध्या हेमंत दाभेकर जामिनावर बाहरे आला असून हा मृत गुंड शरद मोहोळच्या जवळचा असल्याचे मानले जाते. श्रीकांत शिंदे आणि हेमंत दाभेकर फोटो ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत राज्य सरकावर टीका केली आहे.
कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने रविवारी श्रीकांत शिंदेची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. हेमंत दाभेकर हा गुंड शरद मोहोळ गुन्ह्यातील साथीदार असून गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहोळ आणि हेमंत दाभेकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण सध्या हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहरे आला. अशातच श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वर्षा निवासस्थानी हेमंत दाभेकरने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – Ulhasnagar firing : गुन्हेगारांचे राज्य गुन्हेगारांसाठी चालवले जात आहे, ठाकरे गटाचा घणाघात
गुंडांचे इतके बळ का वाढले?
‘राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत’, असा सांगत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जय महाराष्ट्र! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! गुंडांचे इतके बळ का वाढले? या परिस्थितीस जबाबदार कोण? काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभीष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल? गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत.’
मा. गृहमंत्री देवेन्द्रजी
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे.पोलिस स्टेशन मध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात!
गुंडांचे इतके बळ का वाढले?
या परिस्थितीस जबाबदार कोण?
काल सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील… pic.twitter.com/jnmgurI5gm— Sanjay Raut (@rautsanjay61) February 5, 2024
हेही वाचा – Khadse Vs Mahajan : ‘या’ कारणामुळे एकनाथ खडसेंच्या मालमत्तेचा होऊ शकतो लिलाव; गिरीश महाजनांची माहिती
पार्थ पवार आणि गुंड गजानन मारणेची भेट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही कुख्यात गुंड गजानन मारची कोथरूडमध्ये भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवारांसोबत पुणे शहरातील अजित पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित होते. पार्थ पवारांच्या भेटीवरून विरोधकांनी टीका केली होती. पार्थ पवारने अतिशय चुकीची गोष्ट केली असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली होती.