Homeताज्या घडामोडीRaut vs Fadnavis : राऊतांकडून फडणवीसांचे गुणगान, पण मुख्यमंत्र्यांनी रिकाम टेकडे म्हणत...

Raut vs Fadnavis : राऊतांकडून फडणवीसांचे गुणगान, पण मुख्यमंत्र्यांनी रिकाम टेकडे म्हणत फटकारलं!

Subscribe

भाजपचं राजकारण हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रूत्वाचं आहे. कोण कुठे जाणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नाही ठरवू शकत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. पण राऊतांच्या या वक्तव्या रिकाम टेकडे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : भाजपचं राजकारण हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रूत्वाचं आहे. कोण कुठे जाणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नाही ठरवू शकत, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. पण राऊतांच्या या वक्तव्या रिकाम टेकडे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Raut vs Fadnavis Cm Devendra Fadnavis Slams Sanjay Raut)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊतांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले. त्यानुसार, “ते रिकाम टेकडे आहेत, मी थोडी रिकाम टेकडा आहे. ते रोज बोलतात. मी त्यांच्या उत्तराला बांधील नाही”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले राऊत?

“व्यक्तिगत शत्रूत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे. पण व्यक्तिगत शत्रूत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा दुर्देवाने भाजपनं राज्यात सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा वापर करून आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून तरुंगात टाकायचं. ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

“भाजपचं राजकारण हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रूत्वाचं आहे. कोण कुठे जाणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नाही ठरवू शकत, प्रत्येकाचा एक पक्ष असतो. त्या पक्षाचा एक आदर्श असतो. तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या पक्षाला तोडले आहे. हे कोणत्या आदर्शाचे उदाहरण आहे. आम्ही महाराष्ट्रात कोणत्याही राजकारण्यासोबत यंत्रणांचा गैरवापर करून त्याला तुरुंगात टाकत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ही परंपरा तोडत असतील तर, तुमचे स्वागत आहे. पण ज्या भ्रष्टाचाऱ्यांनासोबत तुम्ही घेऊन जात आहेत, त्यांच्याविरोधात आमचा लढा सुरू राहिल”, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली.

- Advertisement -

दरम्यान, राज्याच्या राजकारणात कधी काय घडले, याचा काही आतापता नसतो. मागील अडीच वर्ष भाजप आणि शिवसेना ठाकरे गट हे विरोधात लढत आहेत. पण आता याच दोन पक्षांमधील जवळीक वाढण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण गेल्या काही दिवसांत शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात राजकीय वैर असलेले खासदार संजय राऊत यांच्याकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होतंय. त्यामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जवळीक आणखी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून नागपूर मेडीकल कॉलेज आणि आयजीएमसी मेडीकल कॉलेजची पाहणी

“नागपूर मेडीकल कॉलेज आणि आयजीएमसी हे दोन्ही मेडीकल कॉलेज आहेत, ते अत्यंत जुने मेडिकल कॉलेज आहेत. आयजीएमसी तर एकेकाळी आशियातील सर्वात जूनं मेडीकल कॉलेज म्हणून गणलं जायचं. शंभर-शंभर वर्ष या इमारतींना झाल्या आहेत. त्यामुळे मागील काळात या इमारतींबाबत मास्टर प्लॅन तयार केला आणि 1 हजार कोटी रुपयांचा निधा उपलब्ध करून दिला. तसेच, अध्यावत स्वरुपातील सुविधा याठिकाणी झाल्या पाहिजे, त्यानुसार काम सुरू केले होते. त्यादृष्टीने त्या कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो होतो. या पाहणीदरम्यान दोन्ही मेडिकल कॉलेजची काम प्रगती पथावर दिसत आहेत. पण त्या कामांची गती वाढवण्याची आवशक्यता आहे. त्यासंदर्भातील आढावा घेतलेला आहे. निधीची कमतरता याठिकाणी कुठेच पडणार नाही. त्यामुळे कामं ही वेळेत आणि चांगल्या स्वरुपाची असली पाहिजेत. तसेच, ही शासकीय मेडिकल कॉलेज एका शासकिय मेडीकल कॉलेजपेक्षा चांगल्या दर्जाची असतील, असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आम्ही आढावा घेतला. त्यानंतर एप्रिलला मी पुन्हा पाहणी करणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – CM Devendra Fadnavis : आघाडी राहिल की तुटेल याकडे आमचं लक्षं…; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -