मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटाच्या बकावर जाऊन बसले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहले. विधिमंडळात दोन्ही एकत्र बसून पत्रव्यवहार करत आहेत. काय वेळ आली की, बाजू बाजूला बसून पत्र लिहितात. हे तर ढोंग आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे. तसेच तानाजी सावंत खोटारडे मंत्री आहे, असे म्हणत संजय राऊतांनी आरोग्य विभागातील भ्रष्टाचारावरून त्यांच्यावर निशाणा साधला
मलिकांवरील फडणवीसांच्या पत्रव्यवहारावर राऊतांचा टोला म्हणाले, “काल राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहले नागपूरमध्ये विधिमंडळात दोन्ही एकत्र बसत आहेत. पत्रव्यवहार करत आहेत. काय वेळ आली की, बाजू बाजूला बसून पत्र लिहितात. हे तर ढोंग आहे. तुम्ही उभे राहून नवाब मलिकांना बोलाना किंवा अजित पवार यांना बोला की आम्ही सहन करू शकत नाही आणि भाजपा काय म्हणते की, सत्ता येते आणि जाते. हे तुम्ही आम्हाला सांगताय. देश प्रथम आहे ही नवीन गोष्ट देशाला सांगत आहात. हे सर्व ढोंग आहे”, अशी टीका राऊतांनी केली आहे.
हेही वाचा – Nawab Malik यांच्यावरून संजय राऊतांची BJPवर टीका; “लबाड लांडगे…”
भाजपाचे वॉशिंग मशीन बिघडले
संजय राऊत म्हणाले, “भाजपा असे ढोंग सतत करत आहे. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. जे नवाब मलिकांवर जसे आरोप आहेत तसेच आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहेत आणि या प्रकरणी ईडीने प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. मग प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे. गोंदियात जेव्हा मोदी आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी प्रफुल्ल पटेल आहेत. मोदींनीच प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्ला केला होता. हसन मुफश्री यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. भावना गवळी यांनी ईडी अटक करणार होती. संजय राठोड यांच्यावर आरोप माहिती आहे. मग तुम्हाला हे सर्व चालते का? तुम्ही फक्त नवाब मलिकांना टार्गेट का केले यामुळे मी म्हणतो की, हे ढोंग आहे. मला वाटते की, भाजपाचे वॉशिंग मशीन बिघडली आहे”, असा सवालही भाजपला केला आहे.
हेही वाचा – Ambadas Danve : अजित पवार गटातील आणखी एक नेता दाऊदशी संबंधित, दानवेंचे फडणवीसांना पत्र
“हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल, संजय राठोड आणि भावना गवळी आणि अजित पवार स्वत: या सर्वांवर आरोप आहे. भाजपाने नैतीकतेची गप्पा मारते ना. मग जे लोक तुमच्यासोबत बसलेत त्यांनी तुम्ही कालपर्यंत तुरुंगता टाकत होते. या सर्वांना तुम्ही देशद्रोही म्हटले होते. आता काय फक्त नवाब मलिकच घोटाळेबाज आहे का? तुमच्या आजू-बाजूला त्यांच्याबद्दल तुमचे काय मत आहे? हे तुम्ही देशाला आणि राज्याला सांगा”, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा – ‘नवाब मलिकांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर…’; फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
तानाजी सावंत खोटारडे मंत्री
आरोग्य विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा तुम्ही तानाजी सावंत आरोप केले, यावर उत्तर दिले, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “ते अत्यंत खोटारडे मंत्री आहेत. जे प्रश्ना आम्ही त्यांना विचारले त्यांची त्यांनी उत्तरे दिली नाही. या सर्व बडत्या, बदल्या आणि लिलवा हे तानाजी सावंत यांची केलेले आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवते. राहुल गटे नावाचा अधिकारी तो कोणाचा अधिकारी आहे हे मला माहिती आहे. या अधिकाऱ्याने नवी मुंबई आणि ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कशा बैठका घेतल्या पैसे गोळा करण्यासाठी हे तानाजी सावंत यांना माहिती नाही का? आणि सिव्हिल सर्जन, वैद्यकीय अधिकारी आणि उपसंचालक, सहसंचालक या पदांच्या लिलावसंदर्भात तानाजी सावंत काय बोलेत का? आरोग्य खात्यात जी टेंड्रबाजी सुरू आहे ना, 50 कोटीची टेंड्र हे 500 कोटीला कशी आरोग्य विभागाने दिली आहेत आणि आरोग्य मंत्र्यांना 20-30 टक्के कसे कमिश्न पोचते, सगळे समोर येत आहे, ही क्रिशटल कंपनी कोणाची आहे “, असे प्रश्न विचारात संजय राऊतांनी आरोग्य मंत्र्या घेरले आहे.