घरमहाराष्ट्ररेव्ह पार्टी : बंगलामालक सोनीला पोलीस कोठडी

रेव्ह पार्टी : बंगलामालक सोनीला पोलीस कोठडी

Subscribe

इगतपुरी रेव्ह पार्टी : फॉरेन्सिक लँबकडून नमुन्यांची तपासणी सुरु

कोरोनाकाळात रेव्ह पार्टीसाठी स्काय ताज व्हीला व ताज व्हीला उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी बंगलामालक रणवीर सोनी यास मुंबईतून अटक करत बुधवारी (दि. ३०) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शिवाय, पोलिसांनी नाशिकमधील प्रादेशिक न्यायवैधक प्रयोगशाळेकडे २८ पुरुष व महिलांच्या रक्त व लघवीचे नमुने सादर केले आहेत. त्यातील काही नमुन्यांची नमुन्यांची तपासणीसुद्धा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

इगतपुरीतील ताज स्काय व्हीला व ताज व्हीला या दोन बंगल्यांमध्ये तीन दिवसीय रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. रेव्ह पार्टीतील बिग बॉस फेम हिना पांचाळसह पोलिसांनी ३0 जणांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी रेव्ह पार्टीतील २८ पुरुष आणि महिलांचे वैद्यकीय तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. या सर्वांचे पोलिसांनी रक्त व लघवीचे नमुने संकलित करुन नाशिकमधील प्रादेशिक न्यायवैधक प्रयोगशाळेत मंगळवारी पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर एनडीपीएस कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी दोन्ही बंगल्यांचा मालक रणवीर सोनी यास पोलिसांनी मुंबईतून अटक केली. त्यास बुधवारी (दि.३०) न्यायालयात हजर केले. घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत.

- Advertisement -

अमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच एका तरुणीच्या खिशात ड्रग्जदेखील पोलिसांना अंगझडतीत मिळून आले. ड्रग्ज कोठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे रणवीर सोनीस पोलीस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अ‍ॅड. मिलिंद निर्लेकर यांनी न्यायालयाकडे केली. ती मान्य करत न्यायालयाने सोनीस सात दिवसांची कोठडी सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -