घरमहाराष्ट्ररवी पाटील लागले निवडणुकीच्या तयारीला

रवी पाटील लागले निवडणुकीच्या तयारीला

Subscribe

पेण विधानसभा मतदारसंघातून आपल्याला युतीचे तिकीट मिळणारी याची खात्री भाजपचे नेते व माजी मंत्री रवी पाटील यांना वाटत असल्याने गुरुवारी त्यांनी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत श्री बल्लाळेश्वराचेही दर्शन घेतले. त्यांचा सुधागड दौरा हा प्रचाराचा नारळ फुटावा अशा थाटात झाल्याने भाजप कार्यकर्ते कमालीचे सुखावले आहेत.

हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात युतीकडून शिवसेनेचे किशोर जैन यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव होऊन ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले, तर काँगे्रसकडून लढलेले रवी पाटील दुसर्‍या क्रमांकावर राहून शेकापचे धैर्यशील पाटील यांचा निसटत्या मतांनी विजय झाला. यावेळी महाआघाडीचे तेच उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट असताना सेनेच्या जागेवर भाजपला संधी मिळाली तर पुन्हा दोन पाटलांत लढत होणार हे स्पष्ट आहे. शिवसैनिक मात्र पेणची जागा पुन्हा आमच्याच वाट्याला येईल असे सांगत आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर रवी पाटील यांचा सुधागड दौरा महत्त्वाचा ठरला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हा चिटणीस राजेश मपारा, तालुकाध्यक्ष संजय प्रकाश ठोंबरे, तालुका सरचिटणीस शिरिष सकपाळ, अलाप मेहता, तालुका उपाध्यक्ष सुरेश सकपाळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन दगडे व निहारिका शिर्के, भाऊ गांधी, सरपंच शरद चोरगे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -