घरताज्या घडामोडीपालिकेच्या नवीन धोरणामुळे रस्त्यांची कामे रखडली, रवी राजा यांची पालिका प्रशासनाकडे तक्रार

पालिकेच्या नवीन धोरणामुळे रस्त्यांची कामे रखडली, रवी राजा यांची पालिका प्रशासनाकडे तक्रार

Subscribe

मुंबईतील रस्ते कामांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना पालिका मुदत संपण्यापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असतानाही मुंबई शहर भागात अद्यापही रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नाही, अशी तक्रार पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

वास्तविक, पालिका स्थायी समितीच्या डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या बैठकीत सिमेंट काँक्रीटच्या रस्ते कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. मात्र अद्याप शहर भागातील रस्ते कामांना सुरुवातच करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडलेल्या भागातील स्थानिक नागरीकांना त्याचा खूप मोठा त्रास होत आहे. या कामांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा आणि रस्त्यांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने रस्ते कामांबाबत एक नवीन धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ६ मिटरवरील जे रस्ते आहेत त्यावर एका वेगळ्या पध्दतीने डक्ट केले जाणार आहे. हा धोरणात्मक निर्णय हाताळण्याकरीता सल्लागार नियुक्त केला आहे. परंतु हया सल्लागाराचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी रस्त्यांवर मोठया प्रमाणावर खोदकाम करण्यात आले असून रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

आता दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. प्रशासनाने जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे तो ११ मिटरवरील रस्त्यांवर त्याची अंमलबजावणी करायला हवी. मात्र ६ मिटर रस्त्यावर सदर नवीन प्रणाली वापरल्यास रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे. तरी ११ मिटरवरील रस्त्यांवर डक्ट पध्दत वापरून निर्णय घेण्यात यावी. मागील एका वर्षापासून मुंबईकरांना चांगले रस्ते वापरायला उपलब्ध झालेले नाहीत. या रस्त्यांच्या कामांना विलंब झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या रस्ते कामांबाबत प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी रवी राजा यांनी आयुक्त यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Pakistan Political Crisis : मी राजीनामा देणार नाही, पंतप्रधान इम्रान खान यांचं स्पष्टीकरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -