घरताज्या घडामोडीRavi Rana: एका महिलेशी केलेले गैरवर्तन राज्याने पाहिले, रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Ravi Rana: एका महिलेशी केलेले गैरवर्तन राज्याने पाहिले, रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Subscribe

आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारने एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केले हे सर्वांनी पाहिलं आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि सन्मान करतो. न्यायालयाने आम्हाला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु मला वाटतं महाराष्ट्रात जे कृत्य सुरू आहे ते याआधी कधीही महाराष्ट्रात झालं नाही, असा निशाणा आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे.

जे झालं ते देशातील सर्व रामभक्त आणि हनुमान भक्त पाहत होते. एका महिलेसोबत कशाप्रकारे वर्तन केलं जात होतं, कशाप्रकारे दबाव आणला जात होता हे सर्वांनी पाहिलं. महाराष्ट्रात एका महिलेला तुरुंगात वाईट वागणूक दिली. त्यांना सहा दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यावर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. त्यांना कोणताही उपचार देण्यात आला नाही. आता नवनीत राणा खूप दुःखी आहेत. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

आमचा न्यायालयावर विश्वास आहे आणि सन्मान करतो. न्यायालयाने आम्हाला या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही पालन करणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रात जे कृत्य सुरू आहे ते याआधी कधीही महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची जनतेचा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता होती. त्याची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे, असं रवी राणा म्हणाले.

मी आणि खासदार नवनीत राणा तुरूंगात असताना मला बीएमसी खारमधील आमच्या घरी वारंवार नोटीस देऊन कारवाई करू पाहत आहे, ही इमारत ज्या बिल्डरने बांधली त्याला १५ वर्षांपूर्वी बीएमसीने परवानगी दिली होती. आता १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं. आता द्वेषाची आणि सुडाची कारवाई केली जात आहे, असं देखील रवी राणा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा  : मेहुणीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्ष कारावास


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -