रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला, नवनीत राणांना अश्रू अनावर

Ravi rana meet navneet rana after leave jail navneet rana emotional
रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला, नवनीत राणांना अश्रू अनावर

आमदार रवी राणा यांची भायखळा जेलमधून सुटका झाल्यावर थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. स्पॉंडेलिसिसचा त्रास आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे पती आमदार रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. कोर्टाच्या निकालाची प्रत कारागृहात सादर केल्यानंतर रवी राणा यांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर रवी राणा थेट पत्नी नवनीत राणा यांच्या भेटीसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. दोघांची भेट होताच खासदार नवनीत राणा भावूक झाल्या त्यांना अश्रू अनावर झाले होते.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. रवी राणा आणि नवनीत राणा आणि नवनीत राणा यांची १२ दिवसानंतर जेलमधून सुटका झाली आहे. नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रवी राणा यांनी तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर थेट लिलावती रुग्णलयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली आहे. रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा भावूक झाल्या आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी रवी राणा यांच्या देखील अश्रूंचा बांध फुटला होता. परंतु त्यांनी स्वतःला सावरुन पत्नीला धीर दिला आहे.

कोर्टाच्या निर्णयाची प्रत जेलमध्ये सादर केल्यानंतर नवनीत राणा यांची सुटका झाली आहे. परंतु नवनीत राणा यांच्या छातीत दुखत आहे. तसेच त्यांचा स्पॉंडेलिसिसचा अजार बळावल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील नवनीत राणा जेलमध्ये असताना त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. अटक केल्याच्या दुसऱ्या दिवशीच नवनीत राणा यांनी वेळेत जेवण केले नाही. यामुळे त्यांना उच्चरक्तदाब आणि डोके दुखीचा त्रास जाणवू लागला होता. त्यांच्यावर कारागृहाच्या रुग्णलयात उपचार करण्यात आले.


हेही वाचा : मिलिंद आणि भिडेंना मी व्यक्तिशः ओळखत नाही – शरद पवार