मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाबाबत केंद्रातील नेत्यांकडे तक्रार करणार – रवी राणा

Ravi Rana said will complain about the injustice done through the Chief Minister to PM and om birla
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाबाबत केंद्रातील नेत्यांकडे तक्रार करणार - रवी राणा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीला जाणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जी कारवाई करण्यात आली. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले आहे. तसेच आम्ही कोर्टाच्या अटींचे उल्लंघन केले नसल्याचे देखील स्पष्टीकरण रवी राणा आणि नवनीत राणा यांनी दिले आहेत.

आमदार रवी राणा यांनी मुंबईतील खार निवासस्थानाहून दिल्लीकडे जाताना माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जो आमच्यासोबत अन्याय केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महिला खासदारला वागणूक दिली आहे. पूर्ण पोलीस विभागाच गैरवापर केला आहे. अत्यंत वाईट अशी वागणूक देणारे राज्याचे मुख्यमंत्री द्वेषी, खुन्नस आणि अहंकारी असे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची तक्रार दिल्लीमध्ये करणार असे रवी राणा यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घराची ऑनलाईन पाहणी करावी

आज पालिकेचे पथक मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे पाठवले आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, माझा एकच फ्लॅट मुंबईला आहे. त्याची चौकशी ऑनलाईन करुन घ्या, काही अडचण असेल तर अनिल परब, संजय राऊत हे तुमचे डावे आणि उजवे खाली बसले आहेत. त्यांना पाठवा आणि चारही कोपरे बघून घ्या, मोजमाप करा असे रवी राणा म्हणाले आहेत

राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी वाढली आहे. पाण्याची टंचाई, लोडशेडिंग सुरु आहे. अनेक प्रकरणं असताना रवी राणा, नवनीत राणाला जेलमध्ये टाकण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणा काम करत असतील. राणांच्या फ्लॅटवर कारवाई करुन राज्याचे भले होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी जे काही करायचे आहे ते करावं, मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन फ्लॅटची पाहणी करावी मुख्यमंत्र्यांना दुसरे कोणतेही काम राहिले नाही. द्वेषाचे राजकारण करुन मुख्यमंत्री नागरिकांना वेठीस धरत आहेत.

कोर्टाचा अवमान केला नाही

दरम्यान कोर्टाचा अवमान केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर रवी राणा यांनी आपण कोर्टाचा अवमान केला नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचे कोर्टाचे अवमान केला नाही. आम्ही कोर्टाच्या नियमाचे पालन केलं आहे. त्या विषयाचे उल्लेख न करता आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. कोर्टात जे जात आहेत. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायासाठी मुख्यमंत्र्यांनी कोर्टात धाव घेतली पाहिजे. आम्ही कोर्टाचा सन्मान केला आहे. संविधान आणि लोकशाहीच्या माध्यमातून जे आम्हाला प्रश्न विचारण्यात आले त्याबाबत उत्तर दिलं आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहेत. असे रवी राणा म्हणाले आहेत.


हेही वाचा : ईडीने चौकशी केलेल्या कंपनीकडून सोमय्यांच्या संस्थेला निधी, राऊतांचा सोमय्यांवर आरोप