घरमहाराष्ट्र'आदित्य ठाकरेच होणार मुख्यमंत्री'

‘आदित्य ठाकरेच होणार मुख्यमंत्री’

Subscribe

'आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री होणार' असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय नाट्य काही केल्या संपताना दिसत नाही. निवडणूक निकालाच्या आठवडाभरानंतरही शिवसेना-भाजपचा सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटणे कठीण होत चालला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी ‘आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री होणार’ असल्याचे वक्तव्य माध्यमांशी बोलताने केले आहे.

अमित शहांनी दिलेला शब्द पाळावा

युतीसंदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय घेण्याचा सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. ते या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो घेतली. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे, असे दिसून येत आहे. तसेच अमित शहांनी जो शब्द दिला आहे, तो त्यांनी पाळला पाहिजे, असे देखील ते पुढे म्हणाले आहे.

- Advertisement -

फिप्टी फिप्टी फॉर्म्युला

लोकसभा निवडणुकीवेळी युतीसाठी करण्यात आलेल्या ५० टक्के सत्तेच्या वाट्याच्या फॉर्म्युल्यानुसारच राज्यात युतीचे सरकार स्थापन केले जाईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाबरोबरच सरकारमधील अर्धी मंत्रिपदे आणि महामंडळांच्या वितरणाचे तत्व भाजपला अंगिकारावे लागेल. यामुळे भाजपपुढे नवे संकट उभे राहिले आहे. राज्यातील मतदारांनी अतिशय पारदर्शकपणे जनाधार दिला आहे. तसेच जनतेच्या या निकालामुळेच आता जबाबदारीने काम करावे लागेल. पण इतर कुठल्या प्रश्नाऐवजी रोजच्या आयुष्यातील आणि जीवनमरणाच्या प्रश्नावर काम करा, असा संदेशच लोकांनी दिला आहे. राज्यातील प्रश्नांऐवजी वैयक्तिक टीकेचाही लोक विचार करतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला होता.


हेही वाचा – ‘आमच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी शिवतीर्थावर होणार’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -