घरमहाराष्ट्र"पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतिसुमने...," आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रवींद्र चव्हाणांची टीका

“पुन्हा एकदा मुघलांवर स्तुतिसुमने…,” आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रवींद्र चव्हाणांची टीका

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. “अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यावरून आता वादाला सुरूवात झाली असून राजकारण रंगताना दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र शब्दात सडेतोड उत्तर दिलंय.

जितेंद्र आव्हाढ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला रविंद्र चव्हाण जाहीर निषेध नोंदवलाय. ट्विटर ट्विट करत रविंद्र चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टिकास्त्र सोडलंय. “मुघलप्रेमी असणाऱ्या बोलघेवड्या जितुजींनी पुन्हा एकदा मुघलांवर स्तुती सुमने उधळत छत्रपती शिवाजी राजांबद्दल चुकीचे उद्गार काढलेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत, हे विसरू नको. शेवटी’जित्या’ची खोड… तेच खरं.” असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय.

- Advertisement -

रविंद्र चव्हाण यांच्या ट्विटला रिप्लाय करत जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. “हे सगळं समजायला अक्कल लागते… औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची…” असं लिहित जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय.

- Advertisement -

एकंदरीत जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरू राजकारण पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विरोधकांनी हे चांगलंच उचलून धरलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -