Homeताज्या घडामोडीRavindra Dhangekar : काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'मला त्यांना...

Ravindra Dhangekar : काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘मला त्यांना भेटणं गरजेचं होतं…’

Subscribe

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अशात कोणत्याही परिस्थितीत विजय आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी समोरील पक्षातील नेतेमंडळींची फोडाफोड सुरू केली आहे. खरंतर लोकसभेपूर्वी सुरू झालेले आमदार, खासदार फोडाफोडीचे राजकारण हे विधानसभेतही कायम राहिले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही आमदार, खासदारांच्या फोडाफोडीचं राजकारण होणार अशी चर्चा आहे.

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. अशात कोणत्याही परिस्थितीत विजय आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी समोरील पक्षातील नेतेमंडळींची फोडाफोड सुरू केली आहे. खरंतर लोकसभेपूर्वी सुरू झालेले आमदार, खासदार फोडाफोडीचे राजकारण हे विधानसभेतही कायम राहिले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही आमदार, खासदारांच्या फोडाफोडीचं राजकारण होणार अशी चर्चा आहे. अशात पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, अशात स्वत: धंगेरकरांनीच यावर भाष्य करत त्या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. (Ravindra Dhangekar On Shiv Sena Viral Commenting Of Leaving Congress)

पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यावरून आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई हे काँग्रेसता हात सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र या चर्चांवर स्वत: धंगेरकरांनीच भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेरकर?

“मी वैयक्तीक कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर ते काम करून देतो असं म्हणाले. माझं काम हे त्यांच्याच विभागाचं होतं, त्यामुळे मला त्यांना भेटणं गरजेचं होतं. मी काँग्रेस पक्षात आणि काँग्रेससाठी काम करत आहे. पक्ष जे सांगेल ते काम मी करीन आणि करत राहीन”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले.


हेही वाचा – MNS Raju Patil : खरंच राजू पाटलांना त्यांच्याच गावातून एकही मतं मिळाले नाही का? आकडेवारी काय सांगते