रयत शिक्षण संस्थेवरही पवारांची पॉवर; सचिवपदी निवृत्त सनदी अधिकारी?

संग्रहित छायाचित्र

 

साताराः रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सचिवपदी निवृत्त सनदी अधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे.

मंगळवारी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक, परिषद सदस्य यांची निवड करण्यात आली. विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हेच पुढील सहा महिने राहणार आहेत. कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे रोजी पुण्यातील बैठकीत होणार आहे.

या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, असं शरद पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे. हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो असं म्हणतील, असा टोला शरद पवार यांनी लगावला. त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असं म्हणत शरद पवरांनी सामना अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलं.

ही आहे कार्यकारिणी– उपाध्यक्ष – जयश्री चौगुले (वाशी) , अरुण कडू -पाटील, पी. जे. पाटील (उरण), ॲड. राम काडंगे (पुणे), महेंद्र लाड (पलूस).

हे आहेत सदस्य – ॲड. भगिरथ शिंदे, माजी मंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, रामशेठ ठाकूर, ॲड. रविंद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉ. विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकुगोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्धन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्रा. सदाशिव कदम, धनाजी बलभीम पाटील. आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, विनोदकुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, लाईफ वर्कर प्रतिनिधी- नवनाथ जगदाळे, प्रा, डॉ. संजय नगरकर, सौ. ज्योत्स्ना सुधीर ठाकूर.