नवी दिल्ली : प्रत्येक ग्राहकाला केवायसी करून घेणे महत्वाचे असते. केवायसीची प्रक्रिया ही प्रत्येक वर्गातील ग्राहकांसाठी वेगवेगळी असते. अतिजोखीम असणाऱ्या ग्राहकांसाठी दोन वर्ष, मध्यम जोखीम घेणाऱ्या ग्राहकांसाठी 8 वर्षे तर कमी जोखीम असणाऱ्या ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी करणे आवश्यक असते. ज्यांचा जास्त व्यवहार त्यांच्यासाठी दोन वर्षात एकदा केवायसी अपडेट करणे आवश्यक असते. कारण हँकर्स त्यांच्या खात्यावर लक्ष ठेऊन असतात. मात्र आता केवायसी नसल्यास ग्राहकांचे बँक खाते फ्रिझ करू नका, असे आदेश आरबीआयने बँकांना दिले आहेत. (Dont freeze bank account for not doing kyc process RBI warned all banks.)
हेही वाचा : Naseem Khan : काँग्रेस नेत्याच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघे जण ताब्यात
ज्या बँकेच्या खात्यांमध्ये सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे येतात, त्या खात्यांची केवायसी नसली तरी ती खाती फ्रीझ करू नका, असे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरात असलेल्या लाभधारकांना त्यांच्या बँकांच्या खात्यात दिले जातात. काही वेळेस काही ग्राहकांचे केवायसी नसल्यास खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ही खाती फ्रिझ केली जाऊ नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जे. यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा : Bhalke Vs Awatade : तुतारी अन् इंजिन, भालके की आवताडे, कुणाचा खेळ बिघडवणार? ‘ही’ गावेही ठरणार गेमचेंजर…
बऱ्याच ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन होत नाही आणि त्यामुळे काही ग्राहकांची बँक खाती ही फ्रिझ केली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांचेच पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी येताना दिसत आहेत. त्यामुळे खातेधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक वेळा केवायसी अद्ययावत करण्यात बँकांकडून उशीर होतो. अनेक बँकांकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे केवायसी प्रक्रिया रखडून पडलेली असते. प्रत्येकाचे काम बँका गृहशाखेकडे पाठवतात. ग्राहकांची कागदपत्रे बँकांकडून सिस्टममध्ये अपडेशन केले जात नाही. मात्र या सर्व गोष्टींचा विचार करून आता आरबीआयने ज्या ग्राहकांचे बँक खाते केवायसी केलेले नाही ते फ्रिझ न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Edited By Komal Pawar Govalkar