घरदेश-विदेशRBI : क्रेडिट कार्डच्या बिलिंग प्रक्रियेचे नियम आरबीआयने बदलले, ग्राहकांना दिलासा

RBI : क्रेडिट कार्डच्या बिलिंग प्रक्रियेचे नियम आरबीआयने बदलले, ग्राहकांना दिलासा

Subscribe

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार आता क्रेडिट कार्डधारक त्यांच्या सोयीनुसार कार्डचे बिलिंग सायकल (Billing Cycle) एकापेक्षा जास्त वेळा बदलू शकतील. यापूर्वी बँका आणि इतर वित्तीय संस्था फक्त एकदाच अशी संधी देत ​​असत, परंतु आरबीआयने अलीकडेच ही मर्यादा काढून टाकण्यास सांगितले आहे.

हेही वाचा – Loksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी

- Advertisement -

ग्राहकाला दिलेल्या क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल काय असेल, हे आत्तापर्यंत फक्त क्रेडिट कार्ड कंपन्याच ठरवत होत्या. काहीवेळा ग्राहकांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते, परंतु आरबीआयने नवे नियम जारी केल्याने ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार क्रेडिट कार्डचे बिलिंग सायकल / कालावधी एकापेक्षा जास्त वेळा बदलू शकतात.

एखाद्या ग्राहकाने त्याचे बिलिंग सायकल बदलले, तर त्याच्या क्रेडिट कार्डच्या बिलाची देय तारीख देखील बदलेल. ही देय तारीख स्टेटमेंट तयार झाल्याच्या तारखेपासून 15 ते 20 दिवसांनंतरची असू शकते. याचा अर्थ ग्राहकाला 45 ते 50 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो, ज्यामध्ये बिलिंग सायकलचे 30 दिवस आणि देय तारखेपर्यंत 15-20 दिवसांचा समावेश असतो.

- Advertisement -

असा करा बदल

  • आधी पूर्वीची सर्व थकबाकी भरणे आवश्यक आहे.
  • क्रेडिट कार्ड कंपनीला फोन किंवा ईमेलद्वारे बिलिंग सायकलमध्ये बदल करण्यास सांगावे लागेल.
  • काही बँकांच्या Mobile Appद्वारेही हे बदल करू शकता.

हेही वाचा – Chandrapur Loksabha 2024: चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब; वडेट्टीवारांचा पत्ता कट

हा होईल फायदा

  • ग्राहक आपल्या सोयीनुसार आणि पुरेशा रकमेनुसार बिल भरण्याची तारीख ठरवू शकतात.
  • क्रेडिट कार्डवरील व्याजमुक्त कालावधी वाढवू शकतात.
  • एकाच तारखेला वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सचे पेमेंट करता येईल.

Billing cycle म्हणजे काय?

एखाद्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्डचे एकूण बिल (स्टेटमेंट) दर महिन्याच्या ६ तारखेला येत असेल तर, त्याचे Billing cycle त्या महिन्याच्या 7 तारखेपासून सुरू होते आणि पुढील महिन्याच्या 6 तारखेला संपते. या 30 दिवसांच्या कालावधीत क्रेडिट कार्डद्वारे केलेले सर्व व्यवहार क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर दिसतात. हा बिलिंग कालावधी कार्ड प्रकार आणि क्रेडिट कार्ड कंपनीनुसार 27 दिवसांपासून 31 दिवसांपर्यंत असू शकतो.

हेही वाचा – CJI Chandrachud : ट्रोलिंगचा त्रास मलाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची व्यथा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -