घरमहाराष्ट्रपाचवी, आठवीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

पाचवी, आठवीतील नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा

Subscribe

पाचवी व आठवीच्या नियमित परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यात फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण मिळावे व तो शाळाबाह्य ठरू नये यासाठी पाचवी व आठवीमध्ये अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ही फेरपरीक्षा दोन महिन्यात द्यावी लागणार आहे. केेंद्र सरकारने मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यात हा बदला केला असून, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कायम ठेवणे शक्य होणार आहे. परीक्षेत अनुतीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी शाळा सोडतात. त्यातही पाचवी व आठवीमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी व अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवता यावे, यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये केंद्र सरकारने दुरुस्ती केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीनुसार पाचवी व आठवीमध्ये अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.
पाचवी व आठवीच्या नियमित परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत अनुतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यात फेरपरीक्षा द्यावी लागणार आहे. ही फेरपरीक्षा उतीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.  त्यामुळे अनुतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेतून बाहेर पडण्याचे प्रमाण रोखण्यात यश येईल व शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच फेरपरीक्षेमध्येही विद्यार्थी अनुतीर्ण झाल्यास त्यांना पुन्हा पाचवी व आठवीच्या वर्गामध्ये बसता येणार आहे. त्यामुळे अनुतीर्ण विद्यार्थ्यांच्या शाळातून बाहेर पडण्याला आळा घालण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनुतीर्ण न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीमध्ये विद्यार्थ्यांना अनुतीर्ण न करता पुढील वर्गासाठी त्याचा अभ्यास करून त्याला तयार केले जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पाचवी आणि आठवी इयत्तेमध्ये अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश देण्याच्या घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वाचा: आज तरी लागणार का बेस्ट संपाचा निकाल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -