Lockdown : रिअल इस्टेट क्षेत्रात घरखरेदीत ७८ टक्के घट!

मुंबई महानगर क्षेत्रात 'कोविड- १९' मुळे खूप मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे घर खरेदी रद्द करणाऱ्यांमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. क्रेडई आणि एमसीएचआयने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Home

मुंबई महानगर क्षेत्रात ‘कोविड- १९’ मुळे खूप मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. याचाच परिणाम म्हणजे घर खरेदी रद्द करणाऱ्यांमध्ये २०० टक्के वाढ झाली आहे. क्रेडई आणि एमसीएचआयने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा परिणाम हा सर्वाधिक असा रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला आहे. क्रेडई आणि एमसीएचआयच्या अहवालानुसार अतिशय महत्वाची अशी आकडेवारी समोर आली आहे. दोन्ही संस्थांनी मिळून जवळपास १०० रिअल इस्टेट क्षेत्रातील विकासकांच्या सर्वेक्षणावर आधारीत हा अहवाल सादर केला आहे. फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात जानेवारी महिन्याच्या तुलनेत जवळपास ७८ टक्के घरखरेदी कमी झालेली आहे. तर घरासाठी लोन घेण्याच्या ट्रेंडमध्ये जानेवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात २५० टक्के घसरण झाली आहे. तर घर खरेदीसाठी विचारपूस करणाऱ्यांमध्येही ८० टक्के घट झाली आहे. जवळपास ७७६६ इतक्या नियोजित भेटी ग्राहकांकडून रद्द करण्यात आल्या. तर तिसऱ्या टप्प्यात २०० टक्के इतक्या प्रमाणात या भेटी रद्द करण्यात आल्या.

वर्क फ्रॉम होमचा परिणाम हा ऑफिससाठी जागा विकत किंवा शेअरींग, भाडे पद्धतीने घेण्यावरही झाला आहे. आणखी लॉकडाऊनचा कालावधी वाढला, तर हा ट्रेंड आणखी काही दिवस असेल, अशीही भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी सर्वात मोठा असा आव्हानाचा कालावधी आहे. याची झळ रिअल इस्टेट क्षेत्रासोबतच या क्षेत्राला सेवा पुरवणाऱ्या इतर गोष्टींनाही बसत आहे, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.