शिंदे गटात सामिल झाल्यानंतर गुलाबराव पाटलांनी ‘ती’ रुग्णवाहिका घेतली परत

बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी सामिल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत.

बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी सामिल होत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता माजी मंत्री आणि शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेली रुग्णवाहिकाही शिंदे गटाकडून परत घेण्यात आली आहे. (rebel mla gulabrao patil gifted ambulance to aaditya thackeray takes back eknath shinde group)

गतवर्षी शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून श्रीकांत फाऊंडेशनच्या सहकार्यातून जिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली होती. मात्र आता गुलाबराव पाटील यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता ही रुग्णवाहिका शिवसेनेच्या ताब्यातून परत घेण्यात आली आहे.

परिणामी जळगाव जिल्ह्यात शिंदे गट आणि शिवसेनेत आता राजकीय द्वंद्व पहायला मिळत आहे. गुलाबराव पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तसेच, गुलाबराव पाटील यांच्याकडूनही त्यांना प्रतित्युर दिले जात आहे.

गुलाबराव पाटील यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी, तसेच युवासेना जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना व शिंदे गट यांच्यात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता लढाई सुरू झाली

गुलाबराव पाटील शिवसेनेत असताना त्यांनी जिल्हा रुग्णालयाला दिलेली रुग्णवाहिकाही शिंदे गटाने परत घेतल्याने आता जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा – “मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो”; सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य