संजय राऊत शिवसेनाप्रमुखांना छोटं करतायत, संजय शिरसाटांची टीका

SANJAY RAUT-SHIRSAT

राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. माजी आमदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाद यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्या माणसाने उद्धवसाहेबांना छोटे केले आहे. आता शिवसेनाप्रमुखांना देखील छोटे करायचे काम राऊत करत आहेत. अशा बोचऱ्या शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली.

उद्धवसाहेबांना छोटे केले –

वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले संजय राऊतांवर बोलणे मला योग्य वाटत नाही. त्या माणसाने उद्धवसाहेबांना छोटे केले आहे. आता शिवसेनाप्रमुखांना देखील छोटे करायचे काम राऊत करत आहेत. शिवसेनाप्रमुख हे केवळ एका कुटुंबाचे नाहीत. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते आहेत. त्यांचा सन्मान कमी करण्याचे काम संजय राऊत करत आहेत.

त्यांना राजकारण माहीत नाही –

स्वाभिमान असेल तर स्वत:चा पक्ष काढा, बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरू नका. या राऊत यांच्या विधानाला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे. उद्या जर कुणी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे नाव वापरू नका, तर कसे चालेल? बाळासाहेब ठाकरेदेखील आता त्याच स्तरावर चालले आहेत. याचा अभिमान असला पाहिजे. शिवसेनाप्रमुख ही काय छोटी व्यक्ती आहे का? जगाने देखील त्यांची दखल घेतली. त्या माणसाचे नाव छोटे करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. त्यांना राजकारण माहीत नाही, म्हणून त्यांनी वर्तमानपत्र चालवावे, दुसरे काही करू नये.