घरताज्या घडामोडी'...तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे'; संजय गायकवाडांची ठाकरेंच्या आमदारांना धमकी

‘…तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे’; संजय गायकवाडांची ठाकरेंच्या आमदारांना धमकी

Subscribe

मुख्यमंत्री 'एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे', अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे’, अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यक्रमस्थळी प्रवेश करत आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ घातला. (rebel mla sanjay gaikwad threatened again after dispute in buldhana)

बुलढाण्यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. याघटनेमुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर गायकवाड यांनी धमकी दिली.

- Advertisement -

“ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की शिवसेनेच्या संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे”, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे. शनिवारी बुलढाण्यात पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी झालेल्या हाणामारीमुळे तेथील वातावरण तापलं होतं.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील आमदार यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिदे गटाचे आमदार शिवसेनेच्या आमदारांवर टीका करत असून शिवसेनेचे आमदार शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणत टोला लगावत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 दिवसांत 1.50 कोटींचं दान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -