आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोरांचा अडसर, माझं काय चुकलं?, सुहास कांदे विचारणार सवाल

बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमधील वाद अद्याप थांबलेला नाही. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक आमदारांपासून नगरसेवक शिंदे गटात सहभाग घेत आहे. एकनाथ शिंदेंचा गट हा शिवसेनेचाच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

बंडखोर आमदार आणि शिवसैनिकांमधील वाद अद्याप थांबलेला नाही. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक आमदारांपासून नगरसेवक शिंदे गटात सहभाग घेत आहे. एकनाथ शिंदेंचा गट हा शिवसेनेचाच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढत चालला आहे. अशातच आज युवासेना अध्यक्ष आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) “माझे काय चुकले?”, असे निवेदन देणार आहे. (rebel mla suhas kande will give a statement with many questions during aaditya thackeray visit to nashik)

आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अनेक ठिकाणी सभा घेत ते कार्यकर्ते तसंच नेत्यांसोबत संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे यांची शिव संवाद यात्रा नाशिकमध्ये (Aaditya Thackeray in Nashik) धडकणार आहे. या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे आदित्य ठाकरे यांना निवेदन देणार असल्याने तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या निवेदनात ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा पत्रात उल्लेख करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास कांदे आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी ५ ते ६ हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत.

पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूचं पलायन, सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यांपसून शिवसेना दूर गेली. यामुळे हा निर्णय घेतला, तर यात ‘माझं काय चुकलं’ असा सवाल कांदे आदित्य ठाकरे यांना करणार आहेत.

या निवेदनात भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याची खंतही ते मांडणार आहेत. हे निवेदन देण्याआधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदेनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल केले आहेत.


हेही वाचा – विमानात बॉम्ब असल्याचा प्रवाशाचा दावा; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपासणीवेळी आले सत्य समोर