घरताज्या घडामोडीमुंबईत आल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबईत आल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

Subscribe

उद्या सकाळीच हे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर ते स्मृतिथळावर भेट देतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Rebel MLA Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार गुवाहाटीत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी तिथे मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, बहुमत चाचणीसाठी ते उद्या सर्व मुंबईत येणार असून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेटही देणार आहेत. उद्या सकाळीच हे बंडखोर आमदार मुंबईत दाखल होतील आणि त्यानंतर ते स्मृतीथळावर भेट देतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. आज बंडखोर आमदारांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Rebel MLA will visit the memorial of Balasaheb Thackeray)

हेही वाचा – शिवसेनेची बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर सायंकाळी 5 वाजता होणार सुनावणी

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत दोन फूट पाडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत त्यांनी सेनेतच दुसरा गट स्थापन केला. या गटात सेनेतील तब्बल दोन तृतीयांश नेते असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येतोय. त्यामुळे राज्यात अस्थिरता तर निर्माण झालीच आहे, तर दुसरीकडे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

हेही वाचा

- Advertisement -

बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाने चालणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेल्याने अनेक शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. हा रोष कमी करण्याकरता एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा दाखला दिला जातोय. आम्ही अजूनही शिवसैनिकच आहोत, बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना असल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगितलं जातंय. तसंच, आम्ही बंड पुकारले असले तरीही पक्षांतर केलेले नाही. किंवा इतर पक्षांत विलीनही झालेलो नाही. आम्ही अजूनही शिवैसनिकच असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांकडून करण्यात येतोय.

हेही वाचा – राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या होणार बहुमत चाचणी

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंड पुकारले असले तरीही त्यांनी बाळासाहेबांचा जयजयकार केला आहे. म्हणूनच, मुंबईत आल्यावर त्यांनी स्मृतीस्थळावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ते आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळीदेखील भेट देणार असून छत्रपती शिवाजी महाराजांनाही वंदन करणार आहेत.

हेही वाचा – उद्या मुंबईत येऊन फ्लोअर टेस्ट करणार, एकनाथ शिंदेंची माहिती

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -