बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

या बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं विधिमंडळात आणलं गेलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त पाहिला नाही, असं खोचक टोला युवानेता आदित्य ठाकरे यांनी लगावला.

aditya thackeray

विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन होणार असून यावेळी बंडखोर आमदारांसह सेनेचेही आमदार आज आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, या बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं विधिमंडळात आणलं गेलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त पाहिला नाही, असा खोचक टोला युवानेता आदित्य ठाकरे यांनी लगावला. (Rebel MLAs were brought in as terrorist; Aditya Thackeray slapped)

हेही वाचा –तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

अधिवेशनात एवढा बंदोबस्त मी पहिल्यांदा पाहिला. आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं गेलं. कसाबच्या वेळीही आम्ही एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता. आमदार आणि मीडियामध्ये ही दोरी आहे. ही दोरी या आधी कधीही पाहिली नव्हती. बंडखोर आमदारांसाठी एवढा बंदोबस्त केलाय. त्यांना तुम्ही पुन्हा गुवाहाटीत पळवून घेऊन जाणार आहात की अजून कोणी माहित नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

बंडखोर आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले. तेथून ते गोव्याहून मुंबईला परतले आहेत. तब्बल २० दिवसांनी आज बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. हे आमदार आता सर्व आमदारांसोबत एकत्र बसणार आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे सर्व आमदार मित्र पक्ष आहेत, परिवार म्हणून आम्ही राहिलो, सगळ्यांनाच एकत्र बसायचं आहे. एकत्र काम करण्याची ताकद दाखवू.

विधिमंडळाच्या कार्यालायाला कुलूप कोणी लावलं असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, कार्यालायला आम्हीच कुलुप लावलं आहे. पुन्हा हाऊसमध्येच यायचंय म्हणून कुलूप लावलं असंही ते म्हणाले.