घरताज्या घडामोडीयंत्रमाग कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यास मान्यता - हसन मुश्रीफ

यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यास मान्यता – हसन मुश्रीफ

Subscribe

यंत्रमाग व्यवसायाशी निगडीत जवळपास साडेचार लाख असंघटीत कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.

यंत्रमाग कामगारांना असंघटीत कामगार म्हणून त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळ व्हावे, अशी मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याचे मुश्रीफ म्हणाले.

- Advertisement -

नवीन सूचनेचा विचार करुन सध्या अस्तित्वात असलेल्या बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीला कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रणिती शिंदे , अनिल बाबर, प्रकाश आवाडे, सुभाष देशमुख, मुनीफ इस्माईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव  विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त  (असंघटीत कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – गणपतरावांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार – रामदास आठवले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -