Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र कोयना धरण क्षेत्रात 'रेकॉर्ड ब्रेक' पावसाची नोंद; ६६ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरण क्षेत्रात ‘रेकॉर्ड ब्रेक’ पावसाची नोंद; ६६ टीएमसी पाणीसाठा

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कित्येक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २४ तासात १० टीएमसीने वाढ झाली आहे. यासह नवजा, महाबळेश्वर व वलवण या पाणलोट क्षेत्रात ४०० मिमी पेक्षा जास्त या रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात ६६ टीएमसी पाणीसाठा झाला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -