Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE नाशकात आज रेकॉर्डब्रेक ६८२९ रुग्ण

नाशकात आज रेकॉर्डब्रेक ६८२९ रुग्ण

Related Story

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.१४) रेकॉर्डब्रेक ६ हजार ८२९ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले असून, ही आजपर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक ४ हजार ७६ नवे रुग्ण नाशिक शहरात आढळून आले आहेत. उर्वरित २ हजार ५८५ नाशिक ग्रामीण, ६१ मालेगाव आणि १०७ जिल्ह्याबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर १४ आणि नाशिक ग्रामीणमधील १५ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मार्च २०२० ते १४ एप्रिल २०२१ या कालावधीत तब्बल ९ लाख ३० हजार १९१ संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये २ लाख ४३ हजार ८०१ रुग्ण पॉझिटिव्ह आणि ६ लाख ७८ हजार ८७० रुग्ण निगेटिव्ह आढळून आले असून, ७ हजार ५२० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार ७८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहर १ हजार २९५, नाशिक ग्रामीण १ हजार १७६, मालेगाव २२२ आणि जिल्ह्याबाहेरील ८८ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३७ हजार ७५३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -