घरCORONA UPDATEराज्यातील Recovery Rate वाढतोय! एका दिवसांत १० हजार रुग्णांची कोरोनावर मात

राज्यातील Recovery Rate वाढतोय! एका दिवसांत १० हजार रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ४१७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून तब्बल १० हजार ००४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १६ लाख ३८ हजार ९६१ झाला असून त्यापैकी १४ लाख ५५ हजार १०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४३ हजार १५२ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. यामध्ये १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह केसेस आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

आज, राज्यात १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८८.७८ टक्के इतका झाला आहे. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या २.६३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५ लाख ४८ हजार ३६ रुग्ण नमुन्यांपैकी १६ लाख ३८ हजार ९६१ इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३ हजार ५१० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १४ हजार १७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

हेही वाचा –

KKR vs DC : वरुण चक्रवर्तीने घेतली दिल्लीची फिरकी; KKR विजयी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -