स्टेट बँक ऑफ इंडियाने बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर आणि स्पेशल केडर ऑफिसर पदांसाठी भरती आहे. या पदांसाठी एसबीआय बँकेच्या sbi.co.in या अधिकृत स्थळावर जाऊन अर्ज करता येईल. १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत या एसबीआयमधील या रिक्त पदांसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे.
या पदांसाठी होणार भरती
- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (सेक्टर स्पेशालिस्ट) – ११ पदं
- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट – १० पदं
- क्रेडिट अॅनालिस्ट- ५० पदं
- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (स्ट्रक्चरिंग) – ४ पदं
- डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लानिंग) – १ पद
वेतन किती मिळणार?
डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी ६८,६८० ते ७६,५२० रुपये इतका पगार असेल. तर अन्य पदांसाठी ४२,०२० ते ५१,४९० रुपये इतका पगार असेल.
- Advertisement -
वयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी अर्ज केला असेल तर जास्तीत जास्त ४५ वर्षे वय असावं. तर अन्य पदांसाठी ३५ वर्षे वय असावं.
शिक्षण
कोणत्याही पदांसाठी अर्ज करत असाल तर एमबीए, बीई, बीटेक, सीए ही पदवी हवी. सर्व पदांसाठी पात्रतेचे निकष हे वेगवेगळे आहे.