घरताज्या घडामोडीजिल्हा परिषद शाळांमध्ये 'इतक्या' शिक्षकांच्या भरतीसाठी फेब्रुवारीत ‘टेट’

जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘इतक्या’ शिक्षकांच्या भरतीसाठी फेब्रुवारीत ‘टेट’

Subscribe

जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची तर माध्यमिक शाळांमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी मेरिटनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये २९ हजार ६०० शिक्षकांची तर माध्यमिक शाळांमध्येही अनेक पदे रिक्त आहेत. त्यासाठी फेब्रुवारीत ‘टेट’ होणार असून मार्चमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर जूनपूर्वी मेरिटनुसार संबंधित शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे थेट नियुक्ती दिली जाणार आहे. (Recruitment Of 30000 Teachers In April Tate Exam In February Planning To Make Appointments By June)

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली आहेत. मागील चार वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी टीईटी तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

- Advertisement -

फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील. साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे. परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती मिळते.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.

- Advertisement -

राज्यात जिल्हा परिषदेसह पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास ९७ हजार शाळा असून त्यात सव्वादोन कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या जवळपास १४ हजार शाळांची पटसंख्या २०पेक्षाही कमी आहे. त्या शाळांमध्ये विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळे पटसंख्या जास्त असलेल्या शाळांवर शिक्षक कमी पडू लागले आहेत.

याशिवाय, टीईटी व टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी देखील ‘टेट’ उत्तीर्णचे बंधन आहे. भरती करण्यासाठी एका पदासाठी दहा उमेदवारांना बोलावणे आवश्यक आहे. त्यांची मुलाखत घेऊन खासगी संस्थांवर शिक्षक भरती करावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा ६०,९१२
  • एकूण विद्यार्थी ४३,५५,०७०
  • शाळांवरील शिक्षक २,१४,६६०
  • रिक्तपदे २९,६००

हेही वाचा – तारीख पे तारीख…, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -