घरमहाराष्ट्रRailway Job : रेल्वे विभागाकडून 257 पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची शेवटची...

Railway Job : रेल्वे विभागाकडून 257 पदांसाठी भरती सुरू, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर

Subscribe

मुंबई : सरकारी नोकरी शोधत आहात? तर ही बातमी तुमच्या साठी आहे. सरकारची नोकरीची बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. पदवीधरांसाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. रेल्वेकडून पदवीधरांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 20 डिसेंबर नंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. पदवीधरांसाठी खास संधी आहे. विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

- Advertisement -

हेही वाचा… Government Job : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 4629 पदांसाठी भरती, पगार 1.22 लाख रुपये प्रति महिना

या भरती साठी तुम्ही ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून शकता. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे नोकरीसाठी अर्ज करताना, कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत यांची काळजी घ्या.

- Advertisement -

या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांसाठी भरती होत आहेत, त्यामध्ये शिक्षणाची अट देखील सर्वांसाठी वेगळी आहे. सर्वात महत्त्वाच बाब म्हणेज, उमेदवाराला पदवी घेताना 60 टक्के गुण असले पाहिजेत. यासोबतच उमेदवाराचे सिग्नल, टेलीकॉम, इलेक्ट्रिकलस मेटलर्जी, मॅकेनिकल, बीए, बीबीए आणि बीकॉममध्ये पदवी असणे देखील आवश्यक आहे.

केमिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा झालेले लोकही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसंदर्भात अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट rites.com वर जावे लागेल. तिथे तुम्ही अर्ज करू शकता. RITES Graduate Apprentice Recruitment जाऊन तुम्ही तुमची सर्व डिटेल्स भरू शकता. ही भरती प्रक्रिया 257 पदांसाठी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -