घरमहाराष्ट्रMPSC अंतर्गत भरती प्रक्रियेला मिळणार वेग, अनेक पदांसाठी निघाल्या जाहिराती

MPSC अंतर्गत भरती प्रक्रियेला मिळणार वेग, अनेक पदांसाठी निघाल्या जाहिराती

Subscribe

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तब्बल 21 हजार पदांसाठीची जाहीरात काढण्यात आली आहे, तर उर्वरित काही पदांसाठीच्या जाहीरात या डिसेंबर महिन्यात काढण्यात येणार आहेत.

पुणे : शासकीय सेवेमध्ये रुजू होण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या प्रक्रिया रखडल्याने एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तब्बल 21 हजार पदांसाठीची जाहीरात काढण्यात आली आहे, तर उर्वरित काही पदांसाठीच्या जाहीरात या डिसेंबर महिन्यात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील आठ महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमपीएससी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून देण्यात आली आहे. (Recruitment process under MPSC will get speed, advertisements released for many posts)

हेही वाचा – Central Railway : ‘या’ उपायांमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या सुरक्षीत धावणार

- Advertisement -

MPSC च्या अंतर्गत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पदांची भरती करण्यात येणार आहे. याआधी 2017-18 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 9 हजार 207 पदांची भरती करण्यात आली होती. मात्र, मागील दोन वर्षामध्ये केवळ 8 हजार पदांची भरती करण्यात आली आहे. त्यातील काही उमेदवारांना अद्यापही कामावर रुजू करण्यात आलेले नाही. त्यामुळे विविध पदांच्या भरती प्रक्रियेत पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन देखील केली गेली आहेत. परंतु, आता अ, ब आणि अराजपत्रिक ब गटासह लिपिक पदांच्या भरतीसाठी तब्बल 21 हजार जागांची विविध विभागांकडून मागणी करण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

तर, आता स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करता यावा, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 2024 मध्ये एमपीएससीतर्फे 16 परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे नमूद करण्यता आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे. संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरुप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर या कालावधीत नियोजित आहे. परंतु, हे वेळापत्रक संभाव्य असून यांत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळापत्रकात काही बदल झाल्यास याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -